Uma Bharti selling poha on the street in Tikamgarh as a protest against anti-encroachment action. Saam Tv
देश विदेश

माजी मुख्यमंत्र्यांनी लावला पोह्यांचा स्टॉल; व्हिडिओ व्हायरल, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Uma Bharti Poha Stall Protest Tikamgarh: मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती सिव्हिल लाइन्स टिकमगड येथे हातगाडीवर पोहे विकत दिसल्या. अतिक्रमणविरोधी प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

Omkar Sonawane

मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री तथा भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती मंगळवारी रस्त्याच्या कडेला असलेल्या हातगाडीवर पोहे विकताना दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मंगळवारी (दि,7) माजी मुख्यमंत्री उमा भारती टिकमगड शहरातील सिव्हिल लाइन्स परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या गाडीवरून पोहे विकत होत्या. त्यांनी एक दिवस आधी प्रशासनाने केलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईचा निषेध केला होता. आज, हटवण्यात आलेल्या त्याच गाड्यांपैकी एका गाडीवरून पोहे विकण्यासाठी त्या रस्त्यावर उतरल्या.

काल उमा भारती यांनी प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि अतिक्रमणाचा निषेध केला होता. सदर कारवाई थांबवण्यासाठी त्या स्वतः सिव्हिल लाइन्स परिसरात गेल्या होत्या आणि जोरदार निषेध व्यक्त केला होता. सोमवारी दुपारी स्थानिक प्रशासनाने सिव्हिल लाइन्सवरील अतिक्रमणे हटवल्यानंतर,संध्याकाळी उमा भारती यांनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि ही गरिबांवरील अन्यायकारक कारवाई असल्याचे म्हटले.

प्रशासनाने पहिले मोठ्या लोकांची अतिक्रमणे हटवावीत त्यानंतर हातगाडी विक्रेत्यांवर कारवाई करावी असे त्या म्हणाल्या. सोमवारी रात्री त्या अतिक्रमण झाल्या त्या ठिकाणी पोहोचल्या आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला.

उमा भारती यांनी प्रशासनावर विक्रेत्यांचे नारळ उचलून नेल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या की या ठिकाणी अनेक गरीब लोकांचे दुकाने उद्ध्वस्त करत त्यांच्या पोटावर पाय दिला आहे. त्यांच्या उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला असून मी त्यांना त्यांचे सगळे समान परत करून देईन. जर अतिक्रमण कारवाई करायचीच आहे तर पहिले प्रतिष्ठित लोकांच्या दुकानासमोर जे अतिक्रमण आहे ते त्यांनी काढावे मग इकडे यावे असा इशारा उमा भारती यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : लोकसभेचं कामकाज सुरु होताच केलं तहकूब

Earthquake News : लेह-लडाखला भूकंपाचा जोरदार धक्का; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Uday Samant: मंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, थोडक्यात बचावले; नेमकं काय घडलं?

Railway Job : तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, RPF मध्ये अप्रेंटिसच्या 734 जागांसाठी भरती; कसा कराल अर्ज?

Gold Rate Today : सोन्याच्या दरात विक्रमी वाढ! प्रति तोळा सोन्याचा भाव दीड लाखांवर, मुंबई पुण्यात कसे आहेत दर?

SCROLL FOR NEXT