स्वातंत्रपूर्व काळात भारतावर राज्य करणारे त्याकाळाच ब्रिटिश सरकार आणि आताचा ब्रिटन देश भारताची माफी मागण्यास तयार आहे. ब्रिटन फक्त भारत नाही तर इतर ५६ देशांची गुलामगिरीच्या मुद्द्यावर माफी मागण्यास तयार आहे. परंतु त्यांनी नुकसानभरपाई देण्यास स्पष्टपणे नकार दिलाय. ब्रिटनचे पंतप्रधान अँडी बर्नहॅम कॅरिबियनमध्ये होणाऱ्या ‘कॉमनवेल्थ लीडर्स समिट’ला उपस्थित राहणार आहेत.
याआधी त्यांनी ‘द गार्डियन’मध्ये लिहिलेल्या एका लेखात नमूद केले आहे की, ट्रान्सअटलांटिक गुलाम व्यापारासाठी ब्रिटनच्या वतीने भारतसह ५६ देशांची अधिकृत माफी मागण्यास ते तयार आहेत. मात्र, ते पीडितांना कोणतीही नुकसानभरपाई देणार नाहीत.
एका लेखात अँडी बर्नहॅम लिहिलंय की, ज्यांनी दुःख सहन केले, त्यांच्या वेदनांची त्यांना जाणीव आहे. ते याबद्दल तीव्र खेद व्यक्त करतात आणि माफी मागण्यासही तयार आहेत. लोकांवर लादलेल्या विविध प्रकारच्या क्रूरतेचे डाग आजही कायम आहेत. अशा दुःख आणि वेदनांसाठी आर्थिक भरपाई देणे हा त्यावरचा उपाय नाही; कारण तसे करणे म्हणजे एका अन्यायाच्या जागी दुसरा अन्याय निर्माण करण्यासारखेच ठरेल. आज ब्रिटनमध्ये राहणारे लोक त्या काळातील क्रूरता आणि वेदनांसाठी जबाबदार नसल्याचंही ते या लेखात म्हणालेत.
ब्रिटनचे राजे चार्ल्स सध्या कॅरिबियन देशांच्या दौऱ्यावर आहेत. बहामासमध्ये असताना त्यांनी गुलामगिरीच्या प्रश्नावर भाष्य केलं. ब्रिटिश राजवटीच्या काळात ज्यांनी आपले प्राण गमावले, त्यांना श्रद्धांजली वाहिली. जर ब्रिटनने आपल्या भूतकाळातील वर्तनाबद्दल अद्याप माफी मागितलेली नसली, तरी त्या काळात झालेल्या वेदना, दुःख आणि अत्याचारांची कबुली देत माफी मागणे हे योग्य पाऊल ठरेल.
हे नाकारता येणार नाही की ब्रिटनला गुलाम व्यापारातून नफा मिळाला होता, मात्र, हा व्यापार संपवण्यातही ब्रिटनने महत्त्वाची भूमिका बजावली. अखेरीस १८३३ मध्ये तो बेकायदेशीर घोषित केला होता.
सूत्रांच्या माहितीनुसार, ब्रिटनचे पंतप्रधान अँडी बर्नहॅम यांना भारत दौऱ्यावर यायचे असून, ते लवकरच या दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित करू शकतात. भारतातील ब्रिटनचे कार्यवाह उच्चायुक्त बेन मेलर यांनी गुरुवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पदभार स्वीकारल्यानंतर बर्नहॅम यांनी भारताचे पंतप्रधान मोदी यांच्याशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी भारत भेटीची इच्छा व्यक्त केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.