Indonesia Deports Adult Star Bonnie Blue Saam
देश विदेश

१२ तासांत १,०५७ पुरूषांसोबत शरीरसंबध, एडल्ट कंटेंट क्रिएटरचा दावा; कोण आहे ही महिला?

Indonesia Deports Adult Star Bonnie Blue: बॉनी ब्लूला इंडोनेशियातून डिपोर्ट करण्यात आले आहे. तिच्यावर पर्यटक व्हिसाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला.

Bhagyashree Kamble

ब्रिटनमधील वादग्रस्त एडल्ट कंटेंट क्रिएटर बॉनी ब्लू उर्फ टिया बिलिंगर हिला इंडोनेशियाने देशातून हद्दपार केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंडोनेशियात तिच्या प्रवेशावर किमान १० वर्षांसाठी बंदी घालण्यात आली असल्याची माहिती आहे. शुक्रवारी इंडोनेशियन प्रशासनाने बॉनी ब्लूला अधिकृतपणे डिपोर्ट केलंय.

२०२५च्या सुरूवातीला बॉनी ब्लू प्रचंड प्रकाशझोतात आली होती. तिनं १२ तासांत १,०५७ पुरूषांसोबत लैंगिक संबंध ठेवून जागतिक विक्रम केल्याचा दावा केला होता. या दाव्यामुळे ती वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, या आधीही ती वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.

वादग्रस्त कारणांमुळे तिला याआधीगी ऑस्ट्रेलिया आणि फिजी येथून डिपोर्ट करण्यात आल्याची माहिती आहे. अलीकडे बालीमध्ये ती एका निळ्या रंगाच्या पिकअप ट्रकमधून फिरत असल्याची माहिती होती. तसेच कथितरित्या एडल्ट कंटेंट शूट करत असल्याची माहिती समोर आली आहे. एका व्यक्तीनं याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीनंतर पोलिसांनी स्टुडिओवर छापा टाकला. पोलिसांनी बॉनीसोबत तीन पुरुषांना ताब्यात घेतलं होतं. यातील दोन ब्रिटिश आणि एक ऑस्ट्रेलियन नागरिक होते. प्राथमिक तपासात इंडोनेशियातील पोर्नोग्राफी कायद्यांचे उल्लंघन केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी याचा सखोल तपास केला. मात्र, बॉनी ब्लूविरोधात पोर्नोग्राफीसंदर्भात कोणताही ठोस पुरावा आढळलेला नाही.

त्याऐवजी, तिने पर्यटक व्हिसाचा गैरवापर करून काम केले, तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले. तिच्याकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स नव्हते आणि वाहन नोंदणीही करण्यात आलेली नव्हती. या प्रकरणी न्यायालयाने तिला देशाबाहेर हाकलण्याचे आदेश दिले. इमिग्रेशन प्रमुख हेरू विनारको यांनी सांगितलं की, 'खरंतर ती महिला सुट्टीसाठी आली होती, मात्र व्हिसाचा गैरवापर करून कंटेंट तयार करत असल्याची माहिती आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडक्या बहि‍णींसाठी खूशखबर; नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेमचेंजर घोषणा

नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती, कधी होणार मतदान?

Friday Horoscope : पैशांची चिंता मिटणार,लक्ष्मी प्रसन्न होणार; ५ राशींच्या लोकांसाठी शुक्रवार गेमचेंजर ठरणार

Pune Politics: आरोप सिद्ध नाही झाले तर राजकारण सोडा; मुरलीधर मोहोळ यांचे अजित पवारांना "ओपन चॅलेंज"

भारत-कंबोडिया ते व्हिएन्टिन, दररोज व्हायची मारहाण; किडनी विकलेल्या शेतकऱ्याने मांडली व्यथा, काँग्रेस मदतीला धावली

SCROLL FOR NEXT