Viral Screenshot
Viral Screenshot Twitter/@i_Udita
देश विदेश

लग्नासाठी स्थळ पाठवलं अन् मुलीने केलं 'असं' चॅट! ते पाहून वडीलही संतापले

Sanika

Viral News: मॅट्रिमोनिअल साईटवर लोक आपल्या लाईफ पार्टनरच्या शोधात असतात. परंतु येथे एक मुलीने मॅट्रिमोनिअल साईटवर भेटलेल्या व्यक्तीला असं काही केलं की, हे ऐकून सर्वजण चकित झाले आहेत. ट्विटरवर सध्या एक चॅट व्हायरल होत आहे. यामध्ये मुलीने त्या व्यक्तीशी लग्न करण्याऐवजी त्याला चक्क नोकरीची ऑफर दिली. एवढेच नाही तर तरुणीने त्या व्यक्तीचा बायोडाटा मागितला आणि इंटरव्ह्यूची लिंकही पाठवली. (Udita Pal Screenshot)

त्यानंतर, ही गोष्ट जेव्हा मुलीच्या वडिलांना समजली तेव्हा त्यांची यावर प्रतिक्रिया मात्र बघण्यालायक होती. मुलगी आणि तिचे वडील यांच्यात झालेली चॅटिंग ही ट्विटरवर सध्या व्हायरल होत आहे. या चॅटला उदिता पाल (Udita Pal Viral Screenshot) ने शेअर केलं आहे. उदिता बेंगलोरमधील एक स्टार्टअप कंपनीची फाउंडर आहे.

झाले असे की, नुकतेच उदिताच्या वडिलांनी तिला लग्नसाठी एका व्यक्तीचा बायोडाटा पाठवला होता. परंतु उदिताला वाटले की, हा बियोडाटा तिच्या कंपनीला कामी येऊ शकतो. अन् मग काय... उदिताने या व्यक्तीला बायोडाटा मागितला आणि ऑनलाईन इंटरव्हियूची लिंक देखील पाठवली.

अन् जेव्हा ही गोष्ट उदिताच्या वडिलांना समजली तेव्हा ते तिच्यावर नाराज झाले. त्यांनी तिला मेसेज केला की, तू मॅट्रिमोनिअल साईटवरून लोकांना कामाला नाही ठेवू शकत. यावर उदिताने त्यांना रिप्लाय सुद्धा केला आहे की, 7 वर्षे फिनटेकचा अनुभव उत्तम आहे आणि आम्ही त्यांना कामावर घेत आहोत. मला माफ करा.

उदिताने आता या संभाषणाचा स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर केला आहे. पोस्टला आतापर्यंत 12,000 हून अधिक लाईक्स आणि 1,200 हून अधिक रिट्विट्स मिळाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Tree : आंध्रप्रदेशमधलं निसर्गाचं अद्भुत सौंदर्य; चक्क झाडांच्या खोडातून मिळतं पिण्याचं पाणी

Uddhav Thackeray On Narendra Modi | गाईपेक्षा महागाईवर बोला, ठाकरे बरसले

Sunil Tatkare: राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ महायुतीत नाराज? सुनिल तटकरेंनी केला महत्वाचा खुलासा; म्हणाले...

Char Dham Yatra: चारधाम यात्रेदरम्यान रील बनवण्यावर बंदी, व्हीआयपी दर्शनही बंद; सरकारकडून नवा आदेश जारी

Today's Marathi News Live : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना, तपास गुन्हे शाखेकडे

SCROLL FOR NEXT