supreme court  saam tv
देश विदेश

Thackeray vs Shinde : सत्तासंघर्षासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात उद्या होणार सुनावणी

सर्वाच्च न्यायालयात महाराष्ट्र सत्तासंघर्षासंदर्भात उद्या सुनावणी होणार आहे. उद्या सकाळी १०:३० वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

शिवाजी काळे

Maharashtra Political News : सर्वाच्च न्यायालयात महाराष्ट्र सत्तासंघर्षासंदर्भात उद्या, मंगळवारी सुनावणी होणार आहे. उद्या सकाळी १०:३० वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुभाष देसाई यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भात उद्या,मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सदर सुनावणी ही सकाळी १०:३० वाजता होणार आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुभाष देसाई यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षेखालील ५ सदस्यीय घटनात्मक पीठापुढे ही सुनावणी पार पडणार आहे.

गेल्या २७ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत न्यायालयाने निवडणूक आयोगाला एकनाथ शिंदे यांच्या गटाने केलेल्या दाव्यानुसार शिवसेना पक्षाबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. सोबतच या संदर्भात 1 नोव्हेंबरला सुनावणी घेण्यात येईल असा आदेश दिला होता. आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर उद्या ही महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या वतीने संजय किशन कौल तर सुभाष देसाई यांच्या वतीने कपील सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी हे ज्येष्ठ वकील बाजू मांडणार आहेत. तर केंद्र सरकारच्या वतीने महाधिवक्ते तुषार मेहता बाजू मांडण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT