UCC controversy among NDA allies in Bihar 
देश विदेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

UCC Debate Intensifies in Bihar: सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये चिराग पासवान यांनी म्हटले आहे की, भारतातील समाजातील प्रत्येक घटकाच्या स्वतःच्या प्रथा-परंपरा आहेत. त्यांनी पुढे नमूद केले की, त्यांचा पक्ष विविधता आणि समानता या दोन्ही गोष्टींचा पुरस्कार करतो.

Bharat Jadhav

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या 'समान नागरी कायद्या'बाबतच्या (UCC) विधानावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. बिहारमधील एनडीए (NDA) आघाडीतही यावरून मतभेद दिसून येत आहेत. जेडीयू (JD-U) नेते श्याम रजक यांनी स्पष्ट केले आहे की, हा कायदा बिहारमध्ये कोणत्याही परिस्थितीत लागू केला जाणार नाही.

जेडीयूपाठोपाठ भाजपचे मित्रपक्ष असलेल्या चिराग पासवान यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. चिराग पासवान यांनी सांगितले की, त्यांचा पक्ष समानता आणि विविधता या दोन्ही गोष्टींसाठी कटिबद्ध आहे. त्यांनी पुढे असेही नमूद केले की, समान नागरी संहितेचा (UCC) मसुदा जाहीर झाल्यानंतर त्यांचा पक्ष आपली भूमिका मांडलीय.

भारताची सामाजिक वीण वैविध्यपूर्ण आहे – चिराग पासवान

आपल्या 'एक्स' (X) पोस्टमध्ये चिराग पासवान म्हणाले, "भारताची सामाजिक वीण वैविध्यपूर्ण आहे. प्रत्येक घटकाच्या स्वतःच्या नागरिक परंपरा आणि प्रथा आहेत." संविधानाने हे मान्य केलंय. पाचवी आणि सहावी अनुसूची, अनुच्छेद ३७१-ए आणि ३७१-जी, तसेच आतापर्यंत तयार करण्यात आलेल्या प्रत्येक कायद्यात अनुसूचित जमातींना देण्यात आलेली सवलत हे याचे पुरावे आहेत. माझा पक्ष, 'लोक जनशक्ती पक्ष (रामविलास)', समानता आणि विविधता या दोन्ही गोष्टींसाठी कटिबद्ध आहे. या मसुद्याचे सार्वजनिकरीत्या प्रकाशन केले जावे, सर्व संबंधित घटकांच्या हिताचा विचार केला जावा आणि व्यापक स्तरावर चर्चा व सल्लामसलत केली जावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT