Two Wheeler Toll Update News Saam Tv News
देश विदेश

Two Wheeler Toll : आता बाईकलाही टोल लागणार? १५ ऑगस्टपासून 'या' मार्गांवरून जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे?

Two Wheeler Toll Update News : राष्ट्रीय महामार्ग वापरणाऱ्या दुचाकीस्वारांना १५ ऑगस्टपासून टोल भरावा लागणार आहे. जेव्हा दुचाकी खरेदी केली जाते तेव्हाच टोल कर वसूल केला जातो.

Prashant Patil

नवी दिल्ली : भारत सरकारने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासाठी एक नवीन टोल धोरण लागू केलं आहे. या धोरणानुसार, १५ ऑगस्ट २०२५ पासून, दुचाकी वाहनांना देखील राष्ट्रीय महामार्गांवर टोल भरावा लागणार आहे.

यापूर्वी दुचाकींकडून टोल घेतला जात नव्हता. मात्र आता दुचाकीस्वारांनाही टोल द्यावा लागणार आहे. सरकारनं याबद्दल कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. नवीन नियमांनुसार, दुचाकी आणि दुचाकी चालकांना आता टोल प्लाझावर थांबून टोल कर भरावा लागेल. दुचाकीस्वारकांना किती टोल भरावा लागेल याची रक्कम अद्याप जाहीर केलेली नाही.

राष्ट्रीय महामार्ग वापरणाऱ्या दुचाकीस्वारांना १५ ऑगस्टपासून टोल भरावा लागणार आहे. जेव्हा दुचाकी खरेदी केली जाते तेव्हाच टोल कर वसूल केला जातो. त्यामुळे जेव्हा दुचाकी राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझामधून जातात तेव्हा त्यांच्याकडून टोल कर आकारला जात नव्हता. राष्ट्रीय महामार्गावरील चारचाकी किंवा त्यावरील वाहनांकडूनच टोल कर वसूल केला जात आहे. मात्र आता दुचाकीस्वारानांही टोल भरावा लागणार आहे. नवीन नियमानुसार, दुचाकींची फास्टटॅगद्वारे टोल भरावा लागेल. जो कोणी नियमाचे उल्लंघन करेल त्याला २००० रुपये दंड भरावा लागेल.

नितीन गडकरींचं स्पष्टीकरण

मात्र, याबाबत संपूर्ण चौकशी केली असता असा कोणतचं धोरण सरकारनं लागू केलेलं नाहीय. याबाबत रस्ते वाहतूक मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी देखील याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी ट्वीट (एक्स) करत याबाबत माहिती दिली आहे. त्यात ते म्हणाले आहेत की, 'काही प्रसार माध्यमांकडून दुचाकींवर टोल लागू झाल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. त्याप्रमाणे असा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाहीय. दुचाकींवर इथून पुढेही टोल माफ असरणार आहे', असं गडकरी यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

Maharashtra Politics: मोठी बातमी! रायगडमध्ये भाजपच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Elephanta Caves : 'घारापुरी' लेणीला 'एलिफंटा' हे नाव कसं पडलं? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

उंची कमी असल्यास कपड्यांची निवड कशी करावी? जाणून घ्या 5 स्मार्ट स्टायलिंग टिप्स

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मूळ वेतनात होणार ५१००० रुपयांची वाढ? कसं असेल कॅलक्युलेशन?

SCROLL FOR NEXT