DSP Chakradhar Rao and Shanta Rao death 
देश विदेश

भीषण ! डीएसपी रँकच्या २ पोलीस अधिकाऱ्यांच्या अपघातात मृत्यू

DSP Accident Death: आंध्र प्रदेशात पोलीस गाडीचा ट्रकला धडक, अपघातात डीएसपी चक्रधर राव आणि शांता राव यांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

Namdeo Kumbhar

  • आंध्र प्रदेशात पोलीस वाहनाचा ट्रकसोबत अपघात

  • डीएसपी चक्रधर राव आणि डीएसपी शांता राव यांचा मृत्यू

  • अतिरिक्त एसपी आणि चालक गंभीर जखमी

  • ट्रकने अचानक ब्रेक मारल्यामुळे कार डिव्हायडरला धडकली आणि पलटी झाली

DSP Chakradhar Rao and Shanta Rao death : शनिवारी सकाळी आंध्र प्रदेशमध्ये भीषण अपघात झालाय, त्यामध्ये डीएसपी रँकच्या दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहे. विजयवाडा येथून हैदराबादला जाताना पोलिसांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला, त्यामध्ये दोन पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झालाय.  यदाद्री भुवनगिरी जिल्ह्यातील चौटुप्पल मंडळाच्या कौथापुरम गावात हा अपघात झाला. मृत पोलीस अधिकाऱ्यांची नावे डीएसपी चक्रधर राव आणि डीएसपी शांता राव अशी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही डीएसपी, अतिरिक्त एसपी केव्हीएसएस प्रसाद आणि चालक नरसिम्हा राजू हे स्कॉर्पिओ गाडीमधून विजयवाडाहून हैदराबादला निघाले होते. पोलीस अधिकारी ड्युटीवर हैदराबादकडे निघाले होते. शनिवारी सकाळी त्यांची गाडी ट्रकला धडकली. रिपोर्ट्सनुसार, पोलिसांच्या कारच्या समोर असलेल्या भरधाव ट्रकने अचानक ब्रेक दाबले. त्यामुळे पोलिसांच्या कारचा चालकाने ब्रेक लावण्याच्या नादात रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या डिव्हायडरला धडकली अन् उलटली. पोलिसांची गाडी थेट दुसऱ्या लेनवर जाऊन उलटली. त्याचवेळी त्या लेनवरून हैदराबादहून आलेल्या ट्रकने पोलिसाच्या कारला जोरात धडक दिली.

हा अपघात इतका भीषण होता की पोलिसांच्या कारचा चक्काचूर झाला. डीएसडी चक्रधर राव आणि सांता राव यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर अतिरिक्त एसपी केव्हीएसएस प्रसाद आणि चालक नरसिम्हा राजू गंभीर जखमी झाले. दोघांनाही जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजन असल्याचे समजतेय.

भीषण अपघातनंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. अपघात का आणि कसा झाला? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. राचकोंडा पोलिसांनी सांगितले की, यदाद्री भुवनगिरी जिल्ह्यातील कैथापुरम गावात शनिवारी सकाळी दुर्दैवी अपघात झाला. त्यामध्ये डीएसपी रँकच्या २ पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताचा तपास करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT