कोरोनाने मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये अनिल पाटील
देश विदेश

कोरोनाने मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये

याच कार्यक्रमात कोविडच्या काळात पारंपरिक व्यवसाय अडचणीत आलेल्या 26 व्यक्तींचा पाच हजार रुपयांचे धनादेश देण्यात आले.

अनिल पाटील

गोवा - डबडबलेले डोळे, थरथरणारे हात, आणि आवरलेले हुंदके अशा भावपूर्ण स्थितीत गोवा सरकारच्या समाजकल्याण खात्याच्या वतीने आयोजित कोविड रिलीफ कार्यक्रम पार पडला. पणजीच्या इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभाग्रहात झालेल्या या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत Pramod sawant, समाज कल्याण मंत्री मिलिंद नाईक Milind Naik यांची उपस्थिती होती. त्या कार्यक्रमात कोरोनामुळे covid-19 मृत्यू पावलेल्या 46 व्यक्तींच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये याचे स्वीकृतीपत्र देण्यात आले. याच कार्यक्रमात कोविडच्या काळात पारंपरिक व्यवसाय अडचणीत आलेल्या 26 व्यक्तींचा पाच हजार रुपयांचे धनादेश देण्यात आले.

हे देखील पहा -

गोव्यात कोविड मृत्यू रिलीफ योजनेसाठी 471 अर्ज आले असून त्यापैकी 349 अर्ज मंजूर केले आहेत त्यातील 57 व्यक्तींच्या खात्यात पैसे जमा केले असून 120 व्यक्तींचे अर्ज आरोग्य खात्यात मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. कोविडच्या काळात पारंपरिक व्यवसाय थंडवलेल्या 2 हजार 618 व्यक्तींच्या अर्ज आले असून त्यापैकी 722 अर्जाची पडताळणी पूर्ण झाले असून 120 मंजूर करण्यात आले आहेत. उर्वरित अर्ज पुढील आठवड्यात मंजूर करण्यात येतील. या योजनेवर 100 ते 120 कोटी रुपये अपेक्षित आहेत.

आमचे सरकार अंत्योदय पद्धतीने काम करते. समाजातील खालच्या थरातील व्यक्तींची आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न आहेत. असे सांगत मुख्यमंत्री सावंत यांनी कोविड काळात आरोग्य व्यवस्थेबरोबरच आर्थिक मदत करण्याची घोषणा जाहीर केली होती. त्यांची प्राधान्याने अंमलबजावणी करत आहे. बाहेरचे लोक गोव्यात येऊन चंद्र-तारे तोडून देण्याची भाषा करत आहे त्यांना माहिती आहे.त्यांचे सरकार कधीच येणार नाही. त्यामुळे ते अशा प्रकारच्या घोषणा करत आहे असा टोला नाव न घेता केजरीवाल यांना हाणला.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Junnar ST Bus Accident: गुंजाळवाडीजवळ शेगाव-कल्याण एसटीचा भीषण अपघात; दोन ते तीनवेळा उलटली बस, दोघांचा मृत्यू, १७ जखमी

चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिद्ध दिग्दर्शकाची आत्महत्या; नदीमध्ये सापडला मृतदेह

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! सिमेंट मिक्सरने दोघांना चिरडलं, वडिलांच्या डोळ्यासमोर ८ वर्षीय अहानाने सोडले प्राण

Dagdusheth Halwai Ganpati: पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला 'अ' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा

Diesel Crisis: परभणीत डिझेलची टंचाई, पेट्रोल पंपाबाहेर कॅन घेऊन रांगा; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT