Women IPS-IAS Officer News Saam Digital
देश विदेश

Women IPS-IAS Officer News: सोशल मीडियावरील फोटोवरून महिला IPS-IAS अधिकाऱ्यांमध्ये जुंपली, कोर्ट म्हणालं....

Women IPS-IAS Officer News: कर्नाटकच्या महिला IAS रोहिणी संधुरी आणि IPS डी. रूपा मौदगील याच्यात आठ महिन्यापासून सुरू असलेला वाद गुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वैयक्तिक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यावरून या दोन वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांमध्ये वाद सुरू झाला होता.

Sandeep Gawade

Women IPS-IAS Officer News

कर्नाटकच्या महिला IAS रोहिणी संधुरी आणि IPS डी. रूपा मौदगील याच्यात आठ महिन्यापासून सुरू असलेला वाद गुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वैयक्तिक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यावरून या दोन वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांमध्ये वाद सुरू झाला होता. IAS रोहिणी संधुरी यांनी IPS डी. रूपा मौदगील यांची छायाचित्रे सोशल मीडियावर अपलोड केली होती. त्यावर आक्षेप घेत नंतर डी. रूपा यांनी रोहिणी संधुरी यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. दरम्यान या प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही अधिकाऱ्यांना फटवारलं आहे.

आएएस रोहिणी यांनी स्वत: त्यांच्या फोनवरून तीन परुष आयपीएस अधिकाऱ्यांना छायाचित्रं पाठवली होती. त्यानंतर दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये बराच वाद झाला होता. त्यानंतर डी. रुपा यांच्याविरोधात कोर्टात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला. यात रोहिणी यांनी डी. रुपा यांना पैसे उकळायचे आहेत, त्यामुळे त्या वाद घालत असल्याचा आरोप केला होता. तसेच वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या हेतून हे कृत्य केल्याचा आरोप करताना एक कोटी रुपयांची भरपाई मागितली होती. न्यायालयाने त्याची याचिका स्वीकारून डी. रुपा यांना समन्स जारी केले होते. त्यानंतर डी. रुपा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका रद्द करण्याची मागणी केली होती. मंगळवारी सुप्रीम कोर्टात याच प्रकरणावर चर्चा झाली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर दोन्ही अधिकाऱ्यांना फटकारलं असून परस्पर संमतीने हे प्रकरण मिटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच डी. रुपा यांना त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट हटवाव्यात आणि त्यानंतर न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितलं आहे. हे प्रकण सध्या न्यायालयात प्रलंबित असून निकाल लागेपर्यंत माध्यमांना कोणत्याही प्रकारची मलाखत देऊ नये, अशी सूचना न्यायालयाने दोन्ही अधिकाऱ्यांना केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT