Singapore Brothel Workers latest crime news Saam Tv News
देश विदेश

पैशांचं प्रलोभन, वेश्यांना हॉटेलच्या खोलीत बोलवायचे अन् दोघं मिळून... अखेर दोघांचा 'असा' झाला भंडाफोड

Brothel Workers latest crime news: सिंगापूरमध्ये २ भारतीय युवकांनी वेश्यांवर हल्ला करून लूटमार केलीये. महिलांकडून पैसे अन् दागिने चोरले. आरोपी अटकेत.

Bhagyashree Kamble

  • २ भारतीयांनी वेश्याला लुटलं.

  • महिलांकडून पैसे अन् दागिने चोरले.

  • आरोपी अटकेत.

सिंगापूरमधील दोन भारतीयांना पाच वर्षे तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांच्यावर हॉटेलच्या खोल्यांमध्ये दोन सेक्स वर्कर्सना लुटण्याचा आणि त्यांच्यावर हल्ला करण्याचा आरोप होता. २३ वर्षीय अरोकियासामी डायसन आणि २७ वर्षीय राजेंद्रन माइलारासन अशी आरोपींची नावे आहेत. दोघेही भारतातून सुट्टीसाठी सिंगापूरला गेले होते. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोघांनी सेक्स वर्करला कॉन्टेक्ट केलं. त्यांनी संपर्क साधून त्यांना हॉटेलच्या खोलीत बोलावून घेतलं. आत गेल्यावर दोघांनी पीडितेचे हात पाय बांधून ठेवले. नंतर दोघांनी मिळून पीडितेला मारहाण केली. त्यांनी वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेचे दागिने चोरले. तसेच २००० सिंगापूर डॉलर्सही चोरले. यासह पासपोर्ट आणि बँक कार्डही चोरले.

रात्री ११ वाजताच्या सुमारास, त्यांनी दुसऱ्या हॉटेलमध्ये दुसऱ्या महिलेला बोलावून घेतलं. तिथेही दोघांनी मिळून महिलेचे हातपाय बांधून तिच्याकडून ८०० सिंगापूर डॉलर्स, २ मोबाईल फोन आणि पासपोर्टही चोरला. यानंतर महिलेला तसेच बांधून ठेवले होते.

महिलेला सोडून दिले नाही. जेव्हा महिलेची सुटका झाली, तिनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडित महिलेनं सांगितल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला. यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. पुढील कारवाई करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT