वृत्तसंस्था Saam Tv
देश विदेश

दोन बॉम्बस्फोटांनी हादरलं अफगाणिस्तान; 9 लोकांचा मृत्यू, 13 जखमी

अफगाणिस्तान पुन्हा एकदा बॉम्बस्फोटांनी हादरला आहे. काल गुरुवारी संध्याकाळी झालेल्या दोन बॉम्बस्फोटात 9 जण ठार तर 12 जण जखमी झाले आहेत.

वृत्तसंस्था

बल्ख: अफगाणिस्तान पुन्हा एकदा बॉम्बस्फोटांनी हादरला आहे. काल गुरुवारी संध्याकाळी झालेल्या दोन बॉम्बस्फोटात 9 जण ठार तर 12 जण जखमी झाले आहेत. याबद्दल स्थानिक मीडियाने सुरक्षा अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली.

बल्ख प्रांतातील मजार-ए-शरीफ भागात धमाका झाला. टोलो न्यूजनुसार, दोन्ही स्फोटांमध्ये सार्वजनिक वाहतुकीला लक्ष्य करण्यात आले. स्फोटानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला होता. प्रांतीय आरोग्य अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर, या स्फोटांची जबाबदारी आतापर्यंत कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. तर, गेल्या गुरुवारी मजार-ए-शरीफ येथे झालेल्या स्फोटात 30 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. इस्लामिक स्टेटने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती.

हे देखील पहा-

अफगाणिस्तानमध्ये 21 एप्रिल रोजी मालिका स्फोट झाले होते. ज्यात किमान 10 लोक जागीच मरण पावले आणि 40 हून अधिक जखमी झाले. मात्र, नंतर मृतांचा आकडा 30 च्या पुढे गेला. रमजानच्या या पवित्र महिन्यात उत्तर मजार-ए-शरीफ येथील साई डोकान मशिदीमध्ये नमाज पढत असताना हा स्फोट झाला होता. त्याचवेळी राजधानी काबूलमध्ये आज सकाळी रस्त्याच्या कडेला झालेल्या स्फोटात दोन मुले जखमी झाली. त्या बॉम्बद्वारे देशातील अल्पसंख्याक शिया समुदायाला लक्ष्य करण्यात आले. स्फोटाची ही घटना काबूलमधील दश्त-ए-बरची भागात घडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT