Boat Accident : आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीत दोन बोटींची धडक, ७० पेक्षा जास्त जण बेपत्ता
Boat Accident : आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीत दोन बोटींची धडक, ७० पेक्षा जास्त जण बेपत्ता ANI
देश विदेश

Boat Accident : आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीत दोन बोटींची धडक, ७० पेक्षा जास्त जण बेपत्ता

वृत्तसंस्था

जोरहाट : आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीमध्ये सुमारे 120 प्रवासी असणाऱ्या दोन बोटी धडकून भीषण दुर्घटना झाली आहे. यातील एक बोट माजुलीहून नेमातीघाटाकडे जात होती तर दुसरी बोट विरुद्ध दिशेने जात होती. यात ७० हुन अधिक जण बेपत्ता झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. आसामच्या जोरहाट जिल्ह्यातील नेमातीघाटाजवळ ही घटना घडली आहे. Two boats carrying approximately 120 passengers collided in the Brahmaputra river in Jorhat

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी या दुःखद घटनेवर दुःख व्यक्त केले आणि त्यांनी गुरुवारी नेमातीघाटला भेट देणार असल्याचे सांगितले.

"नेमाती घाट, जोरहाट जवळ झालेल्या दुःखद बोट अपघातामुळे मी दु: खी आहे. माजुली आणि जोरहाट प्रशासकांना @NDRFHQ आणि SDRF च्या मदतीने त्वरित बचाव मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिले. मी उद्या घटनास्थळी भेट देईन." असे त्यांनी ट्विट केले.

या घटनेत काही लोक सुरक्षित पोहून जीव वाचवण्यात यशस्वी झाले आहेत, तर काही प्रवासी अजूनही बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) बचाव कार्य करत आहेत.

आतापर्यंत 50 लोकांना वाचवण्यात आले आहे आणि 70 जण अद्याप बेपत्ता आहेत, असे एनडीआरएफचे उप कमांडंट पी श्रीवास्तव यांनी सांगितले. तर, जोरहाटमधील नेमातीघाट येथे बोट अपघातात एकाच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. बचावकार्य अद्यापही सुरू असल्याचे असे जोरहाटचे एसपी अंकुर जैन यांनी सांगितले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime News : धक्कादायक! आईच्या मित्राची अल्पवयीन मुलीवर वाईट नजर; घरी कोणी नसताना केलं संतापजनक कृत्य

Hindu Rituals: शास्त्रानुसार प्रसाद उजव्या हातात का घेतात?

Today's Marathi News Live : ठरलं! भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार

Team India Sqaud: BCCI कडून मोठी चूक? टीम इंडियात निवड झालेल्या हे 2 खेळाडू IPL 2024 स्पर्धेत सुपरफ्लॉप

Benifits of Walnuts in Summer: उन्हाळ्यात अक्रोड खाण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहित आहे का?

SCROLL FOR NEXT