Jammu-Kashmir Encounter Saam TV
देश विदेश

Jammu-Kashmir Encounter: जम्मू - काश्मीरमध्ये सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; तीन जवान शहीद

Rajouri Encounter: जम्मू - काश्मीरमध्ये सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; तीन जवान शहीद

Satish Kengar

Jammu-Kashmir Encounter:

जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथील बाजी माल भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. यात सैन्याचे तीन जवान शहीद झाले असून दोन जवान जखमी झाले आहेत. शहीद जवानांचा मृतदेह जंगलातून बाहेर काढण्यात आला आहे. सध्या दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सैन्याला माहिती मिळली होती की, याभागात दोन दहशतवादी लपून बसले आहेत. यानंतर या भागात घेराबंदी करून शोध मोहीम सुरु करण्यात आली होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जम्मू येथील पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, राजौरीतील कालाकोट भागातील धरमसाल पोलिस स्टेशनच्या सोल्की गावातील बाजी माल परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्यावर घेराव घालण्यात आला. येथे दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला असून त्याला प्रत्युत्तर दिले जात आहे.  (Latest Marathi News)

जखमी झालेल्या 1 जवानाची प्रकृती चिंताजनक

काश्मीर पोलिस आणि भारतीय सैन्याचे अनेक जवान या परिसराला घेराव घालण्यासाठी तैनात आहेत. जंगलाच्या दिशेने झालेल्या गोळीबारात 2 ते 3 जवान जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील एका जवानाची प्रकृती चिंताजनक आहे.

दरम्यान, जंगलात दोन ते तीन दहशतवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, जे एका स्थानिक रहिवाशाच्या घरी आले होते. गेल्या 4 दिवसांपासून सैन्य आणि पोलीस परिसरात तपासात करत आहेत. यानंतर भारतीय सैन्याचे जवान आणि पोलिसांनी मंगळवारी येथे घेराव घातला आणि शोध मोहीम सुरू केली होती. बुधवारी सकाळपासून येथे चकमक सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: तुळशीजवळ ठेवू नका 'या' गोष्टी घरातून निघून जाईल सुख- शांती

Maharashtra News Live Updates : पाकिस्तानात छत्रपती शिवरायचा पुतळा उभारु - संजय राऊत

Viral Video: आवाजावरून दोन गट एकमेकांना भिडले, हातात काठ्या आणि तलवारी घेऊन जोरदार राडा; पाहा VIDEO

IPL 2025 Auction साठी 1574 खेळाडूंनी नोंदवलं नाव! केव्हा, कुठे आणि कधी होणार ऑक्शन? जाणून घ्या

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृताच्या घरी नवीन पाहुणा कधी येणार? प्रेग्नेंसीबाबत दिली महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT