Elon Musk Saam Tv
देश विदेश

ELon Musk: मस्कचा कारभार, कर्मचारी बेजार! ट्विटर ऑफिसमध्ये पुन्हा गोंधळ; कर्मचाऱ्यांवर आली घरुन टॉयलेट पेपर न्यायची वेळ

टेस्लाचे सीएओ एलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यापासून ते सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असतात.

Gangappa Pujari

Twitter Office: टेस्लाचे सीएओ एलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यापासून ते सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असतात. ट्विटर खरेदी केल्यानंतर त्यांनी तातडीने ट्विटरची पुर्वीची सर्वोच्च कार्यकारणी बरखास्त केली होती. त्याचबरोबर अलिकडेच त्यांनी ट्विटरमधील कर्मचाऱ्यांनाही कामावरुन काढले होते. या बातम्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा ट्विटरच्या ऑफिसमधील नव्या आदेशाने मीडिया जगतात चर्चा रंगली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, चला जाणून घेवू. (Twitter Office)

ट्विटर हे सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया माध्यम म्हणून ओळखले जाते. ज्याची मालकी अलिकडेच टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांच्याकडे गेली होती. ट्विटरच्या खरेदीनंतर मस्क यांच्या अनेक तडकाफडकी आदेशाने उद्योग जगतात चर्चा रंगली होती. काही दिवसांपूर्वीच मस्क यांनी ट्विटरमधील अनेक कर्मचाऱ्यांना नारळ देत कामावरुन काढून टाकले होते. आता ट्विटर ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना घरुन टॉयलेट पेपर नेण्याची वेळ आली आहे.

काही दिवसांपूर्वीच ट्विटर ऑफिसमधील सफाई कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात आले होते. ज्यामुळे ट्विटर ऑफिसमधील बाथरुममधून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येत आहे. तसेच ऑफिसमधील टॉयलेट पेपरही संपले आहेत. यामुळेच कर्मचाऱ्यांना घरुन टॉयलेट पेपर न्यावे लागत आहेत.

इतकेच नव्हेतर एलॉन मस्क (Elon Mask) यांनी सफाई कर्मचाऱ्यांसोबतच सुरक्षा रक्षकांनाही कामावरुन काढून टाकले आहे . त्यामुळे ऑफिसमध्ये सुरक्षा रक्षकही नसल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे. दरम्यान, सफाई कर्मचारी जास्त पैसे मागत असल्याने त्यांना कामावरुन काढून

टाकल्याचेही सांगण्यात येत आहे. थोडक्यात एलॉन मस्क यांच्या तडकाफडकी निर्णयांचा फटका कर्मचाऱ्यांना बसताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रात भरारी पथकाकडून ६६० कोटी १८ लाख रुपयांची जप्त

Maharashtra Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; कोणी गाजवल्या कोणी वाजवल्या? राज्यभरात कोणत्या नेत्याच्या किती झाल्या सभा?

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेत सापडला

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

SCROLL FOR NEXT