Twitter New CEO Saam Tv
देश विदेश

Twitter New CEO: ट्विटरच्या CEO पदी लिंडा याकारिनो, Elon Musk यांनी ट्वीट करत केली घोषणा

Twitter Latest News: आता ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची कमान एका महिलेच्या हातात असणार आहे.

Priya More

Twitter News: ट्विटरच्या सीईओ (Twitter CEO) पदावरुन एलॉन मस्क यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. आता हे पद कोणाकडे जाणार याबाबत जोरदार चर्चा सुरु होत्या. अशामध्ये एलॉन मस्क (Elon Musk) यांना ट्विटरसाठी नवीन सीईओ शोधून काढला आहे. आता ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची कमान एका महिलेच्या हातात असणार आहे. ट्विटरचे मालक आणि अब्जाधीश उद्योगपती एलॉन मस्क यांनी स्वत: ट्वीट करत ही घोषणा केली आहे.

ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी शुक्रवारी रात्री ट्वीट करत ट्विटरच्या नव्या सीईओच्या नावाची घोषणा केली. त्यांनी या ट्वीटमध्ये असे लिहिले आहे की, 'मी ट्विटरच्या नव्या सीईओ म्हणून लिंडा याकारिनो (Linda Yaccarino) यांचे स्वागत करण्यास उत्सुक आहे. लिंडा प्रामुख्यानं प्लॅटफॉर्मच्या व्यवसाय ऑपरेशन्सवर लक्ष केंद्रीत करतील. तर मी उत्पादन डिझाइन आणि नवीन तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रीत करेन. ट्विटरला सर्व गोष्टींसह अ‍ॅप 'X' मध्ये रूपांतरित करण्यासाठी लिंडासोबत काम करण्यास मी उत्सुक आहे.'

दोन दिवसांपूर्वी एलॉन मस्क यांनी ट्वीट केले होते की, '6 आठवड्यांत ट्विटरला नवीन सीईओ मिळेल आणि एक महिला या पदाची सूत्रे हाती घेईल.' त्यावेळी त्यांनी सीईओचे नाव सांगितले नव्हते. पण लिंडा यासारिनो या पदाची सूत्रे स्वीकारतील, अशी चर्चा सुरू झाली होती. अखेर एलॉन मस्क यांनी शुक्रवारी स्वत: ट्वीट करत सीईओ पदी म्हणून लिंडा याकारिनो यांची निवड केल्याची घोषणा केली.

एलॉन मस्क यांनी मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ट्विटर 44 अब्ज डॉलर्सला खरेदी केले होते. ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर एलॉन मस्क यांनी तत्कालीन सीईओ पराग अग्रवाल यांना सीईओ पदावरुन हटवले होते. त्यानंतर त्यांनी स्वत: सीईओ पदाची कमान हाती घेतली होती. लिंडा यासारिनो या एलॉन मस्क याची जुनी मैत्रिण आहे. सध्या त्या NBCUniversal Media या जागतिक जाहिरात कंपनीच्या अध्यक्षा आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rainfall Alert : सतर्क राहा! पुढचे ७ दिवस धो-धो कोसळणार, IMD कडून मुसळधार पावसाचा इशारा

हाडं ठिसूळ झाली? उठता बसता कटकट आवाज येतो? ५ रूपयांचा 'हा' पदार्थ खा, स्ट्राँग हाडांचं सिक्रेट

Skin: जास्त वेळ पाण्यात राहिल्यानंतर त्वचा आकुंचन का पावते?

Maharashtra Live News Update : हुंडा घेणारे नामर्द, अभिनेते मकरंद अनासपुरेंचं परखड मत

Explainer: गुंतवणूकदारांची वाढली धकधक; चीनवर 100 टक्के टॅरिफ, अमेरिकेच्या निर्णयानं भारतावर काय होणार परिणाम?

SCROLL FOR NEXT