ट्विटर नरमले; विनय प्रकाश यांची तक्रार निवारण अधिकारी पदी नियुक्ती Saam tv
देश विदेश

ट्विटर नरमले; विनय प्रकाश यांची तक्रार निवारण अधिकारी पदी नियुक्ती

केंद्र सरकारनं (Central Government) स्पष्ट निर्देश देऊनही ट्विटरनं (Twitter) या नव्या नियमांसंदर्भात (New IT Rules) कोणतीही ठोस कारवाई केली नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : केंद्र सरकारने (central Government) लागू केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (Information technology) कायद्याअंतर्गत ट्विटरने विनय प्रकाश (Vinay Prakash) यांची कंपनीच्या निवासी तक्रार निवारण अधिकारी (Grievance Redressal Officer) पदावर नियुक्ती केली आहे. यासह ट्विटर अकाउंट्सवर विविध प्रकरणांमध्ये केलेल्या कारवाईचा मासिक अहवालही देण्यात आला आहे. कंपनीच्या वेबसाइटवर ही माहिती देण्यात आली आहे. भारत सरकारच्या नव्या आयटी नियमांच्या अंतर्गत ट्विटरकडून 11 जुलै किंवा त्यापूर्वीच तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल, असे ट्विटरने मागील गुरुवारी झालेल्या सुनावणीत म्हटले होते. त्यानुसार विनय प्रकाश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Twitter appointed Vinay Prakash as grievance redressal officer)

दरम्यान, 25 फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारने सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी नवी नियमावली जाहीर केली होती. या नव्या नियमावलीनुसार, या कंपन्यांना भारतात एक तक्रार निवारण अधिकाऱ्याची, एका विभागीय अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचे सांगण्यात आले होते. तसेच 15 दिवसांच्या आत या तक्रारीचे निवारण करण्याचेही आदेश यावेळी देण्यात आले होते. या कंपन्यांची मुख्यालयं विदेशात असली तरी केंद्र सरकारच्या व्यवहारासाठी एक देशात या तक्रार निवारण अधिकाऱ्यांचा अधिकृत पत्ता असावा, असेही या नियमावलीत सांगण्यात आले होते.

परंतु, केंद्र सरकारनं स्पष्ट निर्देश देऊनही ट्विटरनं या नव्या नियमांसंदर्भात कोणतीही ठोस कारवाई केली नाही. त्यानंतर 31 मे रोजी अधिवक्ता अमित आचार्य यांच्या याचिकेवर दिल्ली न्यायालयाने ट्विटरला नोटीस जारी केलं होतं. गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीवेळी, तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती किती दिवसात करणार याची माहिती गुरुवारपर्यंत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. यावर ट्विटरच्या वकीलांनी तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासाठी काही दिवसांचा वेळ मागितला होता.

त्यानंतर दोन दिवसातच, ट्विटरने न्यायालयात प्रतिज्ञापत्रक सादर केलं. केंद्र सरकारच्या नव्या आयटी नियमांनुसार, भारतात ट्विटरकडून लवकरच तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल आणि त्याच्या संपर्काचा पत्ता, मुख्य कार्यालयही भारतातच असेल असेल, असंही ट्विटरने या प्रतिज्ञापत्रकात स्पष्ट केलं. दरम्यान गेल्या महिन्यात 12 जून रोजी ट्विटरने नियुक्त केलेल्या तक्रार निवारण अधिकारी धर्मेंद्र चतुर यांनी आपला राजीनामा दिला होता. त्यानंतर हे पद काही आठवडे रिक्त होते. न्यायालयाने याप्रकरणी जाब विचारल्यानंतर ट्विटरने आज विनय प्रकाश यांची ट्विटरच्या तक्रार निवारण अधिकारी पदावर नियुक्ती केली आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

SCROLL FOR NEXT