चेन्नईतील वन्नाथुरई परिसरात TVK पदाधिकारी कन्नन यांची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली.
हल्ल्याचा घटनाक्रम CCTVमध्ये कैद झाल्याचे वृत्त आहे.
या प्रकरणात पाच संशयितांना अटक करण्यात आलीय.
तामिळनाडूतील चेन्नईमध्ये सत्ताधारी TVK पक्षातील नेत्याची भररस्त्यात हत्या झालीय. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. सहा जणांची टोळीनं नेत्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. कन्नन असं नेत्याचं नाव असून ही हत्येची घटना चेन्नईच्या वन्ननदुरई परिसरात घडलीय. कन्नन यांच्या हत्येची घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पाच संशयितांची चौकशी सुरू आहे. हाती हल्ल्यात मृत पावलेल्या कन्ननची गुन्हेगारी पार्श्वभूमीही होती. दरम्यान पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.
शनिवारी रात्री चेन्नईच्या बेसंत नगर भागात एका टोळीने कन्नन नावाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या केली. पोलिसांच्या माहितीनुसार, कन्नन नुकताच टीव्हीके (TVK) पक्षात सामील झाला होता. शनिवारी रात्री वन्ननदुराई भागात त्याची हत्या करण्यात आली. कन्नन हे रामस्वामी अव्हेन्यूवरील आपल्या कार्यालयाकडे जात होते. वाटेतच सहा जणांच्या टोळीने त्याच्यावर हल्ला केला.
या टोळीने त्याच्यावर धारदार शस्त्रांनी अनेक वार केले, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. ही क्रूर घटना तेथे बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली आहे. या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. मारेकऱ्यांच्या अटकेसाठी पाच विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.