Turkey Influencer Death Saam Tv News
देश विदेश

आधी डॉक्टरांसोबत पार्टी, दुसऱ्या दिवशी स्तन अन् नाकावर सर्जरी; ऑपरेशनच्यावेळी ३१ वर्षीय Influencerचा मृत्यू

Turkey Influencer Death : तुर्कीमध्ये एका चुकीच्या कॉस्मेटिक सर्जरीनंतर एका ३१ वर्षीय Influencerचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्या त्या महिलेनं प्रक्रियेच्या आदल्या रात्री तिच्या डॉक्टरांसोबत पार्टी केली होती.

Prashant Patil

तुर्की : तुर्कीमध्ये एका चुकीच्या कॉस्मेटिक सर्जरीनंतर एका ३१ वर्षीय Influencerचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्या त्या महिलेनं प्रक्रियेच्या आदल्या रात्री तिच्या डॉक्टरांसोबत पार्टी केली होती. डेली मेलमधील वृत्तानुसार , स्तनची सर्जरी, लिपोसक्शन आणि नाकाची सर्जरी केल्यानंतर काही तासांतच अॅना बारबरा बुहर बुलद्रिनी हिचं निधन झालं. अॅना बारबरा बुहर बुलद्रिनी असं या इनफ्ल्यूंअसरचं नाव आहे. शुक्रवारी ती तिच्या पतीसोबत शस्त्रक्रियांसाठी मोझांबिकहून इस्तंबूलला गेले होते. तिचे पती, कलाकार एल्गर माइल्स यांनी ब्राझिलियन वृत्तसंस्थेला सांगितलं की, 'रुग्णालयाच्या जाहिरातीच्या बदल्यात तिला मोफत शस्त्रक्रिया मिळत आहेत. तिला तिच्या सौंदर्याचा दर्जा सुधारण्यासाठी या प्रक्रिया करायच्या होत्या. हे तिचं स्वप्न होतं,' असं माइल्स म्हणाले.

कॉस्मेटिक प्रक्रियेपूर्वी पार्टी

शनिवारी अॅना आणि तिच्या पतीने सर्जनसोबत रात्री दारू पिऊन बाहेर पडल्याची माहितीही समोर आली आहे. तिच्या शस्त्रक्रियेच्या एक दिवस आधी, तिच्या पतीनं सांगितलं की, 'ही प्रक्रिया बुधवारी होणार होती. त्यांनी विचारले की बुधवाऐवजी दुसरा दिवस मिळावा म्हणून तारीख बदलता येईल का. वेळेच्या अडचणींमुळे सर्जनने ते रविवारपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. आम्ही रविवारी फक्त जागा पाहण्यासाठी क्लिनिकमध्ये गेलो होतो, परंतु डॉक्टरांना अॅना तयार न होता प्रक्रिया करायची होती,' असंही माइल्स म्हणाले. 'आदल्या रात्री पार्टी करूनही, सर्जनने अॅनाला कॉस्मेटिक सर्जरी करण्यास राजी केलं. डॉक्टरांनी मला आश्वासन दिलं की कोणतीही समस्या नाही आणि सर्व काही ठीक होईल,' असं माइल्सने एका वृत्तसंस्थेला सांगितलं.

शस्त्रक्रियेनंतर मृत्यू

एल्गर माइल्सने पुढे सांगितलं की, 'तुसा रुग्णालयात अॅनावर स्तनाची शस्त्रक्रिया, चरबी काढून टाकणे आणि नाकाचे ऑपरेशन करण्यात आले. रविवारी रात्री ११ वाजेपर्यंत ती ऑपरेशन थिएटरमधून बाहेर पडली. शस्त्रक्रियेतून बाहेर आल्यानंतर तिचे हृदय मंदावू लागले. त्यांनी मला खोलीत जायला सांगितलं, सहाय्यक विचित्र वागत होते. मी तिला घेण्यासाठी १ तास १५ मिनिटे वाट पाहिली. मी तळमजल्यावर गेलो आणि एका डॉक्टरने सांगितलं की तिचे हृदय हळूहळू धडधडत आहे. तर दुसऱ्यानं सांगितलं की ती आधीच मेली आहे' असं माईल्सने सांगितलं.

तुर्की टुडेने दिलेल्या वृत्तानुसार , 'तुसा हॉस्पिटलनं म्हटलं आहे की, 'रुग्णाने सर्व आवश्यक वैद्यकीय संमती फॉर्मवर स्वाक्षरी केली होती. बरे होण्याच्या टप्प्यात तिला अनपेक्षित गुंतागुंत झाली ज्यामुळे वेंट्रिक्युलर फायब्रिलेशन झाले. त्यानंतर अॅनाला हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा मृत्यू झाला. आमच्या तज्ज्ञ भूलतज्ज्ञ पथकाच्या सर्व प्रयत्नांनंतरही, रुग्णाला पुन्हा जिवंत करता आलं नाही,' असं हॉस्पिटलने म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2025: ७ सप्टेंबरला दुर्मिळ चंद्रग्रहण, या ३ राशींना होणार भरपूर फायदा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढण्याची शक्यता, आतापर्यंत फक्त ४.५६ कोटी करदात्यांनी केलाय अर्ज

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

SCROLL FOR NEXT