Truck and Car Accident in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये भीषण रस्ते अपघातात एकाच कुटंबातील 11 जणांचा जीव गेला आहे. बोलेरो कार आणि ट्रकमध्ये झालेल्या या अपघतात कारचा चक्काचूर झाला आहे. लग्न समारंभाहून घरी परतत असताना हा अपघात झाला. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी देखील याबाबत दु:ख व्यक्त केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोलेरोमधील सर्व लोक बाराटी कांकेर जिल्ह्यातील मरकटोला येथे विवाह सोहळ्यासाठी गेले होते. परतत असताना बालोद जिल्ह्यातील जगत्राजवळ ही घटना घडली. सर्व लोक एकाच कुटुंबातील होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोलेरेने ट्रकला धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. बुधवारी रात्री (3 मे) 10 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. (Latest News)
या अपघातात सहा महिन्यांची मुलगी देखील गंभीर जखमी होती. तिला उपाचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिचाही मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पाच पुरुष, पाच महिला आणि एका लहान मुलीचा समावेस आहे.
अपघाताची माहिती मिळताच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ट्विट केले आहे की, लग्न समारंभासाठी जाणारी बोलेरो आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत 10 जणांचा मृत्यू झाला असून एका चिमुकची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या आत्म्यास शांती मिळो आणि त्यांच्या कुटुंबियांना धैर्य मिळो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.