crime update saam tv
देश विदेश

Crime News: मित्रांसोबत जंग्गी दारू पार्टी, नंतर पती अन् साथीदारांकडून पत्नीवर सामूहिक बलात्कार, नवऱ्याला अटक

Woman with disability assaulted: पश्चिम त्रिपुरामध्ये एकाने आपल्या मित्रांसोबत बायकोवर लैंगिक अत्याचार केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपी नवऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत.

Bhagyashree Kamble

एका व्यक्तीला पोलिसांनी पत्नीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी अटक केली आहे. महिला ७५ टक्के बौद्धिक अपंगत्व आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीने मित्रांसोबत दारू पार्टी केली. नंतर दारूच्या नशेत त्याने त्याच्या मित्रांसोबत पत्नीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केला. ही धक्कादायक घटना पश्चिम त्रिपुरामध्ये घडली आहे. या घटनेची माहिती पीडितेच्या वडिलांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.

सुब्रत आपल्या पत्नीसोबत जोगेंद्रनगर येथे आपल्या सासरी राहत होता. त्याची पत्नीला ७५ टक्के बौद्धिक अपंगत्व आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जानेवारीला सुब्रतने त्याच्या मित्रांसोबत चौमुखानी बाजार परिसरात दारू पार्टीचे आयोजन केले होते. तो मित्रांसोबत दारू प्यायला बसला.

दारूच्या नशेत सुब्रत आणि त्याचे मित्र त्याच्या सासरच्या घरी गेले होते. नंतर सुब्रत आणि त्याच्या मित्रांनी त्याच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेची माहिती पीडित महिलेच्या वडिलांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी १४ मार्चला पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

यासंदर्भात पोलीस अधिकारी मृणाल पॉल म्हणाले की, या प्रकरणी सध्या पोलिसांनी कारवाई करत सुब्रत डे याला अटक केली आहे. तर, इतर पाच आरोपी फरार आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पोलिसांनी पीडितेचा जबाब दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवला आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. सध्या आरोपी अटकेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT