west bengal political news  Saam tv
देश विदेश

२९ खासदार असलेला पक्ष फुटणार? १८ खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार? चर्चांना उधाण

political news : पश्चिम बंगालमध्ये राजकीय घडामोडींना वेग येताना दिसत आहेत. २९ खासदार असलेल्या तृणमूल काँग्रेस पक्ष फुटीच्या मार्गावर असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

Vishal Gangurde

तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय घडामोडींना वेग

तृणमूल काँग्रेसचे १२ हून अधिक खासदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा

खासदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने ममता बॅनर्जी यांंचं टेन्शन वाढलं

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर तृणमूल काँग्रेस फुटीच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. परंतु अद्याप कोणीही या घडामोडीला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. १२ हून अधिक खासदार भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. तर आधीच काही टीएमसी नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. काही आमदार टीएमसी पक्षाशी दूर जाताना दिसत आहेत.

'संघवाद प्रतिदिन'च्या रिपोर्टनुसार, तृणमूल काँग्रेसचे १२ खासदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. या यादीत ५ ते ६ खासदारांची नावे आणखी वाढण्याची शक्यता देखील सूत्रांनी व्यक्त केली आहे. तृणमूल काँग्रेस कोणते खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, याची माहिती समोर येऊ शकलेली नाही. तसेच बंडखोर खासदार भाजपमध्ये कधी प्रवेश करणार, याविषयी कोणतीही माहिती हाती येऊ शकलेली नाही.

रिपोर्टनुसार, १२ हून अधिक खासदारांची भाजप प्रवेशाची चर्चा आहे. हा आकडा २० पर्यंत देखील पोहोचू शकतो. लोकसभेत तृणमूल काँग्रेसचे एकूण २९ खासदार आहेत. त्यापैकी दोन तृतियांश खासदारांनी तृणमूल काँग्रेसची साथ सोडल्यास त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होणार नाही, असं बोललं जात आहे.

सध्या खासदारांच्या संख्येवर बोलणी सुरू आहे. पक्षांतर बंदी कायद्यात अडकू नये, यासाठी रणनीती आखली जात असल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे. येत्या पावसाळी अधिवेशनापर्यंत स्थिती स्पष्ट होईल. भाजपमध्येप प्रवेश करू इच्छिणारे अनेक खासदार तृणमूल काँग्रेसच्या पक्षप्रमुख ममता बॅनर्जी आणि त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्या जवळचे नेते आहेत.

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीत पराभव झाल्यानंतर २० मे रोजी पहिल्यांदा तृणमूल काँग्रेसने आंदोलन केलं होतं. या आंदोलनात टीएमसीचे बहुतेक आमदार आंदोलन सहभागी झाले नव्हते. या आंदोलनानंतर पक्षाचील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. या आंदोलनासाठी ८० आमदारांपैकी केवळ ३५ आमदार हे पोहोचले होते. पश्चिम बंगालमध्ये पराभव झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसने पुन्हा मोर्चेबांधणी करण्यासाठी सुरूवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सायन–पनवेल महामार्ग जलमय; कळंबोलीत महामार्गावर वाहतुकीचा वेग मंदावला

Ayodhya Ram Temple : अयोध्येतील राम मंदिर व्यवस्थेत मोठे बदल; देणगी घोटाळ्यानंतर सर्वच नियम बदलले

फक्त नथच नाही! नोज पिनच्या या ५ सुंदर डिझाईन्स साडीवर उठून दिसतील

Rent Agreement: रेंट एग्रीमेंट संपण्यापूर्वीच भाडेकरूने घर सोडल्यास डिपॉझिटचे काय होते? घरमालक पैसे जप्त करू शकतो का?

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! पंक्चर काढताना पिकअपला अज्ञात वाहनाची धडक; चाकाखाली चिरडून ४ तरुणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT