Vande Bharat Express Update Saam Tv
देश विदेश

Vande Bharat Express Update : दोन आठवड्यात आणखी एक वंदे भारत धावणार, समोर आली मोठी अपडेट

Vande Bharat Express : इंदूर-निजामुद्दीन वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी जुलैमध्ये होणार असून ती कवच प्रणालीसह सुसज्ज असेल. या एक्सप्रेसची पलवल-मथुरा मार्गावर होणार आहे.

Alisha Khedekar

भारतीय रेल्वे इंदूर-निजामुद्दीन वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी जुलैमध्ये होण्याची शक्यता आहे.ही चाचणी पलवल (हरियाणा) आणि मथुरा (८७ किमी) दरम्यान होईल, ही एक्सप्रेस भारतीय रेल्वेने विकसित केलेल्या सुरक्षा तंत्रज्ञान कवच प्रणालीने सुसज्ज आहे.

चाचणी दरम्यान, ही ट्रेन आग्रा कॅन्ट स्टेशनवर ५ ते ७ मिनिटे थांबेल असे गृहीत धरण्यात आले आहे. ही ट्रेन कमाल १६० किमी/ताशी वेगाने धावेल, सरासरी वेग १२०-१३० किमी/ताशी दरम्यान असेल. या चाचणीसाठी, ६ ते ८ कोच वापरले जाणार आहेत. रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एक नवीन ट्रेन रेक आधीच नवी दिल्लीत पोहोचली आहे आणि लवकरच चाचणी सुरू होईल. तथापि, अंतिम चाचणी तारीख रेल्वे बोर्डाच्या मंजुरीनंतरच निश्चित केली जाईल.

सध्या इंदूरमध्ये फक्त एकच वंदे भारत एक्सप्रेस आहे जी इंदूर आणि नागपूर दरम्यान धावते. ही ट्रेन इंदूरहून सकाळी ६:१० वाजता निघते, भोपाळला सकाळी ९:१० वाजता पोहोचते आणि नागपूरला दुपारी २:३० वाजता पोहोचते. परतीच्या प्रवासात ही ट्रेन नागपूरहून दुपारी ३:२० वाजता सुरू होते , भोपाळला रात्री ८:३८ वाजता पोहोचते आणि इंदूरला रात्री ११:५० वाजता पोहचते.

इंदूरचे खासदार शंकर लालवाणी म्हणाले की, इंदूर आणि नवी दिल्ली दरम्यान वंदे भारत ट्रेनची मागणी सहा महिन्यांपूर्वी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे करण्यात आली होती. एकदा कार्यान्वित झाल्यानंतर, ही ट्रेन इंदूर आणि नवी दिल्ली दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी जलद आणि अधिक आरामदायी पर्याय ठरेल.

कवच म्हणजे काय?

कवच ही भारतीय बनावटीची स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली आहे. ती मानवी चुकांमुळे होणारे अपघात टाळण्यास मदत करते, जसे की गाडीचा वेग वाढला तर कवच लोको पायलटला धोक्याचा सिग्नल देऊन सतर्क करते आणि गरज पडल्यास आपोआप ट्रेनचा वेग कमी करते किंवा थांबवते. खराब हवामानातही ते सुरक्षित ट्रेन ऑपरेशन सुनिश्चित करते. आगामी चाचणीमध्ये पलवल-मथुरा मार्गावरील कवच प्रणालीची कार्यक्षमता आणि कार्यप्रणालीची देखील चाचणी केली जाईल.मध्य प्रदेशातील प्रवाशांना आशा आहे की यशस्वी चाचण्यांनंतर इंदूर-निजामुद्दीन वंदे भारत लवकरच प्रवासासाठी उपलब्ध होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 Final: भारत आणि पाकिस्तानमध्ये फायनल,आशिया कप स्पर्धेत कोण बाजी मारणार?

Kendra Trikona Rajyog: 30 वर्षांनंतर शनीने बनवला पॉवरफुल योग; 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा

Todays Horoscope: 'या' राशीच्या व्यक्तींनी मनाचा कौल घेऊन पुढे जावं; वाचा राशीभविष्य

Hans Mahapurush Rajyog: 100 वर्षांनी दिवाळीला गुरु बनवणार हंस राजयोग; 'या' राशींना बिझनेसमधून मिळणार नफा

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

SCROLL FOR NEXT