Indian Railway : आता रेल्वे प्रवासात राहणार तुमच्यावर २४ तास नजर; जाणून घ्या सविस्तर

Indian Railway New Rules : भारतीय रेल्वेने ७४,००० डब्यांमध्ये आणि १५,००० इंजिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलले असून, एआय आधारित प्रणालीमुळे देखरेख अधिक प्रभावी होणार आहे.
indian Railway Latest Rules
Indian Railway Saam Tv
Published On

भारतीय रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून एक मोठा निर्णय घेतला आहे. आता लांबपल्ल्याच्या प्रत्येक ट्रेनच्या सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. रविवारी रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, रेल्वेने प्रवासी डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे. धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत बऱ्याच काळापासून अनेक प्रकरणे समोर येत आहेत. या घटनांचं गांभीर्य लक्षात घेता रेल्वेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी इंजिन आणि डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या प्रगतीचा आढावा घेतला. शनिवारी झालेल्या या बैठकीला रेल्वे बोर्डाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. यानंतर, रेल्वेने म्हटले आहे की, "या पावलामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेत लक्षणीय सुधारणा होईल. दुष्कर्म करणारे आणि संघटित टोळ्या निष्पाप प्रवाशांचा फायदा घेतात. कॅमेरे बसवल्याने अशा घटनांमध्ये लक्षणीय घट होईल. प्रवाशांची गोपनीयता राखण्यासाठी, दरवाज्याजवळील सामान्य हालचाली क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील."

कॅमेऱ्याची सेटिंग कशा प्रकारे असेल ?

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, “उत्तर रेल्वेच्या इंजिन आणि डब्यांमध्ये यशस्वी चाचण्या पार पडल्या आहेत. रेल्वेमंत्री यांनी ७४००० डब्यांमध्ये आणि १५००० रेल्वे इंजिन मध्ये सीसीटीव्ही बसवण्यास मंजुरी दिली आहे." प्रत्येक प्रवेशद्वाराजवळ २ कॅमेरे असतील, प्रत्येक डब्यामध्ये ४ डोम प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे असतील. एक पुढील बाजूस, एक मागच्या बाजूस आणि दोन्ही बाजूंना प्रत्येकी एक अश्याप्रकारे प्रत्येक इंजिनमध्ये ६ सिसिटीव्ही कॅमेरे असतील. प्रत्येक इंजिनच्या केबिनमध्ये (पुढील व मागील) १ डोम सीसीटीव्ही कॅमेरा आणि २ डेस्क माउंटेड मायक्रोफोन बसवले जातील.

आधुनिक समस्यांसाठी आधुनिक देखरेख

रेल्वेत बसवले जाणारे सीसीटीव्ही कॅमेरे सर्वोत्तम तांत्रिक विशिष्टतेसह आणि एसटीक्यूसी प्रमाणित असणार आहेत. यासाठी रेल्वेमंत्र्यांनी सर्वोत्तम दर्जाची उपकरणे वापरण्याचा आग्रह धरला आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, १०० किमी प्रतितास किंवा त्यापेक्षा जास्त वेगाने धावणाऱ्या गाड्यांमध्ये आणि कमी प्रकाशातही उच्च दर्जाची चित्रीकरण फीत उपलब्ध होईल, याची खात्री करावी.त्यांनी अधिकाऱ्यांना इंडियाएआय मिशनच्या सहकार्याने सीसीटीव्ही फुटेजवरील डेटावर एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापरण्याची शक्यता शोधण्यासाठी अधिकाऱ्यांना प्रोत्साहित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com