Haryana Accident update  Saam tv
देश विदेश

Accident : अस्थी विसर्जन करून परतताना भरधाव कारची ट्रकला धडक; एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

Haryana Accident : अस्थी विसर्जन करून परतताना एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे.

Vishal Gangurde

हरियाणाच्या करनाल जिल्ह्यात अपघाताची भीषण घटना घडली आहे. या अपघातात सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये ही घटना घडली आहे. करनाल जिल्ह्यातील फरीदपूर गावातील सहा सदस्यांचा मृत्यू झाला आहे. अस्थी विसर्जन करून परतताना ही दुर्घटना घडली आहे.

पानिपत-खटीमा महामार्गावरून सकाळी ६ वाजताच्या सुमारास फरीदपूर गावातील कुटुंबाची भरधाव कार उभ्या असलेल्या ट्रकची धडकली. या अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. या अपघातानंतर उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ यांनीही शोक व्यक्त केला.

कुटुंबाचे प्रमुख महेंद्र जुनेजा यांचं तीन दिवसांपूर्वी कर्करोगाने मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांचे कुटुंबीय त्यांच्या अस्थी घेऊन हरिद्वारला रवाना झाले होते. कारमध्ये महेंद्र यांची पत्नी मोनिका, मुलगा पीयुष, दोन्ही बहिणी अंजू आणि मोहिनी, दाजी राजेंद्र, मुगला हार्दिक आणि चालक शिवा होते. कार चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रकला जोरदार धडक दिली. अपघातानंतर एकच आरडाओरड झाली. रस्त्यावरील उपस्थित लोकांनी जखमींची मदत केली. त्यांनी तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल केलं.

फरीदपुरातील कुटुंबासाठी दुसरा मोठा धक्का बसला आहे. महेंद्र यांच्या मृत्यूमुळे कुटुंब दु:खात असताना एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताने फरीदपूर गावात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी अपघातस्थळावरील मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवले आहे. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. पोलिसांनी अपघात प्रकरणी पुढील तपास सुरु केला आहे.

मुख्यमंत्री योगी यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी मृतांच्या नातेवाईकाला प्रत्येकी ५-५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Municipal Corporation : ठाणे महापालिकेत ACBचा छापा; कार्यलायात उपायुक्तांची चौकशी सुरु

Dussehra Melava: दसरा मेळावा कुणाचा किती कोटींचा? दसरा मेळाव्यावरून पेटलं राजकारण

शेतकऱ्यांच्या खिशावर सरकारी दरोडा; मदतीच्या नावाखाली कापला खिसा?

Maharashtra Politics : संजय राऊतांचे झोंबणारे बाण, शिंदेसेना हैराण; मेळाव्याआधी पुन्हा खऱ्या शिवसेनेवरून वाद,VIDEO

Dussehra: दसर्‍याला आपट्याचीच पाने ‘सोने’ म्हणून का लुटतात? एकमेकांना का वाटतात सोनं?

SCROLL FOR NEXT