Andhra Pradesh News  Saam Tv
देश विदेश

Shocking News: 'दादा मी तुला यावेळी राखी नाही बांधू शकणार...', नवविवाहितेने भावासाठी पत्र लिहित संपवलं आयुष्य

Andhra Pradesh Crime: रक्षाबंधन सणापूर्वीच नवविवाहित तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आंध्र प्रदेशमध्ये घडली. आत्महत्येपूर्वी तिने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये भावासाठी भावनिक मेसेज लिहिला. 'दादा मी तुला यावेळी राखी नाही बांधू शकणार...', असं तिने लिहिले.

Priya More

रक्षाबंधन सणापूर्वीच बहीण-भावामध्ये ताटातूट झाल्याची धक्कादायक घटना आंध्र प्रदेशमधून समोर आली आहे. आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यामध्ये एका २४ वर्षीय शिक्षिकेने आत्महत्या केली. ६ महिन्यांपूर्वीच या शिक्षिकेचे लग्न झाले होते. या नवविवाहित तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली. यामध्ये तिने आपल्या लाडक्या भावासाठी शेवटचा मेसेस लिहिला. 'दादा मी तुला यावेळी राखी नाही बांधू शकणार...', असे तिने लिहिले. तसंच, नवरा आणि त्याच्या कुटुंबीयांनी त्रास दिल्याचा आरोप केला.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीविद्या असं आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. ती एका खासगी महाविद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत होती. सहा महिन्यांपूर्वीच तिचे गावातील तरुण रामबाबूसोबत लग्न झाले होते. श्रीविद्याने सुसाईड नोटमध्ये नवरा आणि सासरची लोकं कसा त्रास देत होते हे सांगितले. लग्नाला एक महिना झाल्यानंतर तिचा नवरा तिला प्रचंड त्रास देत होता. तिचा नवरा नेहमी दारूच्या नशेत घरी यायचा आणि तिला मारहाण करायचा. या मानसिक आणि शारीरिक त्रासाला ती कंटाळली होती.

आत्महत्या करण्यापूर्वी नवविवाहितीने सुसाइड नोटमध्ये लिहिले की, 'रामबाबूने मला एका दुसऱ्या महिलेच्या समोर अपमानास्पद वागणूक दिली. मला तो वाईट असल्याचे म्हणाला. त्याने मला खूप मारहाण केली. माझे डोकं जमिनीवर आपटले आणि माझ्या पाठीमध्ये बुक्का मारला. माझ्या या अवस्थेला माझा नवरा आणि त्याचे कुटुंबीय जबाबदार आहेत. आरोपींना कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडू नका.'

श्रीविद्याने सुसाईड नोटमध्ये आपल्या लाडक्या भावासाठी शेवटचा मेसेज लिहिला. 'दादा तू तुझी काळजी घे. मी यावेळी तुला राखी नाही बांधू शकणार.' श्रीविद्याच्या आत्महत्येमुळे तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या प्रकरणी त्यांनी तिचा नवरा आणि सासरच्या लोकांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे आंध्र प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bleeding From Mouth: तोंडातून रक्त येणे हे कोणत्या गंभीर आजाराचे लक्षण आहे? जाणून घ्या

Nashik News: १००-२०० मध्ये काय येतं, दारूचे भाव किती वाढले...ट्रॅफिक पोलिसासाठी रिक्षावाल्याची तोडपाणी, व्हिडिओ व्हायरल

Chicken Shops : चिकन, मटण शॉप, कत्तलखाने बंद राहणार; स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा झटका, वरिष्ठ नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी खरी ठरली, भारतावर आणखी २५ टक्के टॅरिफ|VIDEO

SCROLL FOR NEXT