Accident News Saam tv
देश विदेश

पार्टीवरून परतताना काळाचा घाला! कार-ट्रकच्या धडकेत ३ तरुण ठार, ४ जणांची मृत्यूशी झुंज

Kushinagar highway car and truck accident latest news : उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे भीषण अपघातात कार आणि ट्रकची जोरदार धडक होऊन ३ तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर गोरखपूर येथे उपचार सुरू असून ट्रक चालक फरार आहे.

Namdeo Kumbhar

Latest road accidents in Uttar Pradesh : ७ मित्र पार्टी करून कारने घराकडे येत होते, पण त्याचवेळी काळाने घाला घातला. हायवेवरच एका ट्रकने कारला जोरात धडक दिली. या भीषण अपघातात ३ तरूणांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी आहेत. उत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे हा भयंकर अपघात झालाय. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करत मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले. पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला असून चौकशी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावर पळ काढला. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

कुशीनगर येथील ७ तरूण पार्टी करण्यासाठी घरातून निघाले होते. रात्री उत्साहात पार्टी करून ते सर्वजण घराकडे परत येत होते. पण त्याचवेळी काळाने घाला घातला. हायवेवर असणाऱ्या लग्नाच्या हॉलसमोरच ट्रकने कारला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की आजूबाजूला आवाज गेला, कारचा चुराडा झाला. कारमधील तीन जणांचा जागेवरच मृत्यू झाला. चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बीआरडी मेडिकल कॉलेज गोरखपूर येथे उपचार करण्यात येत आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी सांगितलेय.

हाटा नगरपालिकेतील वॉर्ड ४ मध्ये राहणारे ७ मित्रांनी तुलादास हॉटेलमध्ये पार्टी केली. त्यानंतर कारने सातही जण घराकडे येत होते. एक किमी अंतरावरच त्यांच्या कारला जोरात धडक दिली. ट्रकचा वेग इतका भीषण होता की कारचा चुराडा झाला. तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात संतापाचे वातावरण होते. लोकांचा रोष पाहून ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

पुरुषोत्तम 23 वर्ष, कृष्ण मुरारी 20 वर्ष, श्रवण वर्मा 26 वर्ष या तिघांचा जागेवरच मृत्यू झाला. सूरज वर्मा 22 वर्ष, शैलेश वर्मा 18‌ वर्ष, खासमुकेश वर्मा 19 वर्ष, विकास वर्मा 26 वर्ष हे चार जण या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. अपगातानंतर हाटा येथील सरकारी रूग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. पण प्रकृती गंभीर असल्याने त्यांना गोरखपूरमधील रूग्णलयात हलवण्यात आले आहे. चार जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. अद्याप त्यांच्या प्रकृतीत सुधारणा कमीच असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar : उत्तरे मिळायला हवीत! अजित पवार विमान अपघात अहवालावर जय पवार नाराज, स्पष्ट शब्दात म्हणाले...

Maharashtra Live News Update : खासदार निलेश लंके यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम

Raigad Tourism : अलिबागजवळील 'हा' सागरी किल्ला एकदा पाहाच, अरबी समुद्राच्या मनमोहक सौंदर्याच्या प्रेमात पडाल

Bigg Boss Marathi 6 : एक नव्हे 'बिग बॉस'मध्ये थेट ३ वाइल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री, घराचे तापमान वाढणार

Sanju Samson : गौतम गंभीरची गुगली! संजू सॅमसन नाही तर 'हा' खेळाडू आहे विजयाचा खरा शिल्पकार

SCROLL FOR NEXT