Crime News  yandex
देश विदेश

Pune News: प्रेमात संशय कल्लोळ, तृतीयपंथीने आयुष्य संपवलं, रूपानं प्रियकराच्या घराबाहेरच प्राण सोडले

Transgender Love Story: पुण्यातील तृतीयपंथीयाने विष पिऊन आत्महत्या केली आहे. जयपूरच्या तरूणासोबत तृतीयपंथी रिलेशनशिपमध्ये होता. संशयावरून आणि बोलणं बंद केल्यामुळे रूपानं टोकाचं पाऊल उचललं.

Bhagyashree Kamble

पुण्यातील तृतीयपंथीयाला जयपूरचा तरूण आवडला. दोघांमधले प्रेम बहरले. ते दोघेही ३-४ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. काही दिवसांपूर्वी तृतीयपंथीयाला संशय आला. प्रियकर आपल्याला धोका देत असल्याच्या संशयाने मनात घर तयार केलं होतं. तृतीयपंथीयाने थेट जयपूर गाठलं. मात्र, प्रियकर न भेटल्यानं त्यानं थेट कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना जयपूरच्या सांभरजवळील भादरपुरा गावात घडली असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

१४ जानेवारीला भादरपुरा गावातील सांभार तलाव परिसरात एका तृतीयपंथीयाचा मृतदेह आढळला होता. मृतदेहाजवळ एक पिशवी आणि किटकनाशकाची बॉटल सापडली. तसेच पुण्याहून जयपुरचे विमानाची तिकीटही बॅगेत होती. तृतीयपंथीयाच्या फोनमध्ये त्याच्या बहिणीचा कॉल आल्यानंतर त्याची ओळख पटली. मृत तृतीयपंथीयाचे नाव रूपा देवी माहेश्वरी असून, तो पुण्यातील एका गावातील रहिवासी होता. रूपा कायम जयपूरस्थित प्रियकराला भेटण्यासाठी जायची.

सोमवारी १३ जानेवारीला तो सायंकाळी विमानानं जयपूरला पोहोचला. सांभारस्थित प्रियकाराच्या घराबाहेर खूप वेळ थांबला. नंतर त्यानं प्रियकराला बाहेर बोलावण्यासाठी आवाज दिला. मात्र, आवाज देऊनही तो काही बाहेर आला नाही. त्यानंतर १४ जानेवारीला तृतीयपंथीयाचा मृतदेह प्रियकराच्या घरापासून काही अंतरावर आढळून आला. कीटकनाशक पिण्यापूर्वी त्यानं एक सुसाईड नोट लिहून ठेवले होते. जे पोलिसांच्या हाती लागले आहे.

सुसाईड नोटमध्ये लिहिले प्रेमात फसवणूक झाली..

तृतीयपंथीय एके दिवशी सांभारला गेला होता. त्याची भेट तरूणाशी झाली. दोघांमध्ये मैत्री झाली. नंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. रूपा प्रियकराला भेटण्यासाठी कायम पुण्याहून सांभार गाठायची. तरूणाच्या कुटुंबाला या घटनेची माहिती मिळाली. कुटुंबियांनी त्याला तृतीयपंथीयासोबत बोलणं बंद करण्यास सांगितले. त्यानंतर रूपाला संशय आला. रूपाने प्रियकराला भेटण्यासाठी सांभार गाठले. पण रूपाला प्रियकरानं भेटण्यास नकार दिल्यामुळे तृतीयपंथीयानं थेट टोकाचं पाऊल उचलत स्वत:ला संपवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratalyachi Kheer Recipe: सुट्टीच्या दिवशी गोड खाण्याची इच्छा होते? मग घरी झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी रताळ्याची खीर

Mumbai Crime : धक्कादायक! मुंबई लोकलमध्ये ट्रान्सजेंडरने नको ते केले, तरुणीच्या अंगाला स्पर्श केला अन्....

Benefits of Good Sleep: कोणत्या वयोगटातील व्यक्तींना किती तासांच्या झोपेची गरज असते? न्यूरोलॉजिस्टने सांगितली परफेक्ट स्लीप गाईड

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

Matoshree : मातोश्रीवर नजर ठेवली जातेय, ठाकरेंच्या नेत्यांचा गंभीर आरोप, तो व्हिडिओ केला पोस्ट

SCROLL FOR NEXT