dog attack  saam tv
देश विदेश

Shocking News : मालकीण फोनवर बोलत होती, अचानक हातातून कुत्र्याचा पट्टा निसटला; 4 वर्षांच्या मुलीसोबत भयंकर घडलं, थरार कॅमेऱ्यात कैद

dog attack on minor girl in gujarat : मालकीणीच्या हातातून कुत्र्याच्या गळ्यातील पट्टा निसटला. त्यानंतर या कुत्र्याने ४ वर्षीय मुलीवर हल्ला केला. हा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झाला.

Vishal Gangurde

गुजरातच्या अहमदाबादमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. अहमदाबादच्या हाथीजन सर्कलजवळ राधे इमारतीच्या आवारात एका पाळीव कुत्र्याने लहान मुलीवर हल्ला केल्याची घटना घडली. कुत्र्याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात चार वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. मुलीच्या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेचा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

नेमकं काय घडलं?

मालकीण कुत्र्याला घेऊन इमारतीच्या आवारात आली होती. मालकिणीच्या हातातून कुत्र्याच्या गळ्यातील पट्टा निसटला. या कुत्र्याने महिलेच्या कुशीत असलेल्या चार वर्षांच्या मुलीवर हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर जखमी झालेल्या चार वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सोसायटीत एकच आक्रोश पाहायला मिळाला. मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यांनी सुरुवातीला मुलीचा पोस्टमार्टम करण्यास नकार दिला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादच्या इमारतीत राहणारी महिला कुत्र्याला घेऊन घराबाहेर निघाली होती. त्याचवेळी मुलीला घेऊन तिची काकी घराबाहेर आली होती. मुलीला घेऊन इमारतीच्या आवारात असणाऱ्या खुर्चीवर बसली. यावेळी कुत्र्याने मुलीवर अचानक हल्ला केला. कुत्रा हा इमारतीत राहणाऱ्या दिलीप पटेल यांचा होता. स्थानिकांनी सांगितलं की, 'पटेल यांची मुलगी फोनवर बोलत होती. त्याचवेळी या मुलीच्या हातातून कुत्र्याच्या गळ्यातील पट्टा निसटला. या कुत्र्याने मुलीवर जीवघेणा हल्ला केला'.

सीसीटीव्हीमध्ये थरार कैद

सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे की, कुत्र्याच्या गळ्यात पट्टा होता. परंतु कुत्र्याने मुलगी ऋषिकाच्या काकीवर हल्ला केला. यात काकी मुलीला घेऊन पडल्या. या कुत्र्याने ४ वर्षाच्या मुलीला हिसकावून घेतलं. त्यानंतर कुत्र्याने मुलीवर हल्ला सुरु केला. कुत्र्याच्या हल्ल्यानंतर काकी आणि मुली या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

डॉक्टरांनी ऋषिकाला मृत घोषित केले. मृत ऋषिकाचे काका राजू डाभी यांनी पोलिसांना सांगितलं की, कुत्र्याची हल्ला करण्याची ही तिसरी की चौथी वेळ आहे. कुत्र्याच्या मालकाला कठोर शिक्षेची मागणी केली जात आहे. कुत्र्याच्या मालक आणि मालकीणीच्या निष्काळजीपणामुळे ४ वर्षांच्या मुलीचा झाल्याचा आरोप राजी डाभी यांनी केला. ४ वर्षांच्या मुलीच्या मृत्यूने तिच्या कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT