Pressure Cooker Saam Tv News
देश विदेश

Youth deaths: झोपेनं घात केला! कुकरमध्ये चणे टाकले अन् डोळा लागला, गुदमरून दोघांचा मृत्यू

Pressure cooker accident Deaths: बसई गावात दोन तरूणांचा घरात गुदमरून मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना नोएडाच्या सेक्टर ७० मधील बसई गावात घडली असून, दोघांचा असा दुर्देवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Bhagyashree Kamble

नोएडातील बसई गावात दोन तरूणांचा घरात गुदमरून मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना नोएडाच्या सेक्टर ७० मधील बसई गावात घडली असून, छोळे भटूरे स्टॉलसाठी रात्री चणे प्रेशर कुकरमध्ये शिजत ठेवले होते. दोघांना अचानक झोप लागली आणि घर धुरानं भरलं होतं, काही वेळानंतर गुदमरून दोघांचा मृत्यू झालाय. काही तासानंतर शेजाऱ्यांना दोघेही मृतावस्थेत आढळले असून, दोघांचा असा दुर्देवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

यासंदर्भात नोएडा सेंट्रल झोनचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजीव गुप्ता म्हणाले, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. २२ वर्षांचा उपेंद्र आणि २३ वर्षांचा शिवम अशी मृत व्यक्तीची नावे आहेत. रात्री स्टोव्हवर प्रेशर कुकरमध्ये चणे शिजत ठेवल्यानंतर दोघांनी झोप लागली. इतक्या गाढ झोपेत दोघेही गेले की त्यांना आपण प्रेशर कुकरमध्ये चणे शिजत ठेवले होते, याची कल्पनाही त्यांना नव्हती.

स्टोव्हवर चणे प्रेशर कुकरमध्ये शिजत असल्यामुळे घर धूरानं भरलं होतं. घराचा दरवाजा बंद असल्यामुळे खोलीत ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली. जळणाऱ्या अन्नाच्या धुरासोबत खोलीत कार्बन मोनोऑक्साईडचे प्रमाण वाढले होते. विषारी धुरामुळे गुदमरून दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. काही तासानंतर खोलीतून धूर येत असल्याचं त्यांनी निदर्शनास आले.

शेजाऱ्यांनी तातडीने घराचा कुलूप तोडला आणि घरात प्रवेश केला. दोघांना बेशुद्ध अवस्थेत पाहून शेजाऱ्यांना धक्काच बसला. त्यांनी तातडीने जवळच्या खासगी रूग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या शरीरावर कोणत्याही जखमा किंवा खुणा नव्हत्या. पोलिसांनी त्यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : पुणेकरांनो सावधान! भेसळयुक्त खवा-मावा, तूप अन् तेलाची विक्री, २ कोटींचा साठा जप्त

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना भाऊबीजेची ओवाळणी मिळणार? ऑक्टोबरचे ₹१५०० जमा होणार

Maharashtra Live News Update: गुंड निलेश घायवळने ताबा मारलेले 10 सदनिका सील करण्याचे आदेश

Diwali 2025: देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात 'या' राशी; दिवाळीमध्ये गडगंज श्रीमंत होणार व्यक्ती

Maharashtra Politics: सोलापुरात मोठी राजकीय उलथापालथ; भाजपची ताकद वाढली, बड्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांचा जम्बो पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT