Samajwadi Party leader killed in hoarding collapse 
देश विदेश

Hoarding Collapse : भयंकर! धावत्या कारवर पेट्रोल पंपाचे होर्डिंग कोसळलं, सपा नेत्याचा दुर्दैवी मृत्यू

Samajwadi Party leader killed in hoarding collapse : उत्तर प्रदेशातील प्रतापगडमध्ये पेट्रोल पंपाचे होर्डिंग धावत्या कारवर कोसळल्याने समाजवादी पक्षाचे नेते लाल बहादूर यादव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून पोलिस तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

UP Pratapgarh Accident News : उत्तर प्रदेशातील प्रतापगडमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. भररस्त्यात चालत्या कारवर पेट्रोल पंपाचे विराट लोखंडी होर्डिंग कोसळले. या दुर्दैवी घटने समाजवादी पार्टीचे नेते लाल बहादूर यादव यांचा जागीच मृत्यू झाला आहे. होर्डिंग इतके मोठं होतं की कारचा चक्काचूर झाला. या भयंकर दुर्घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ माजली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशमध्ये होर्डिंगचा मुद्दा आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (Pratapgarh petrol pump hoarding accident details)

नेमकं काय झालं होतं? दुर्घटने कशी घडली ?

समाजवादी पार्टीचे नेते लाल बहादूर यादव कारमधून जात होते. त्यावेळी अचानक वाऱ्याच्या वेगाने अथवा इतर कोणत्या कारणामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या पेट्रोल पंपाचे उंच आणि वजनदार होर्डिंग थेट त्यांच्या धावत्या कारवर कोसळले. होर्डिंग जड आणि वजनदार होते. त्यामुळे होर्डिंगच्या वजनाने कारचा चक्काचूर झाला. कारमध्ये असणाऱ्या लाल बहादूर यादव यांना बाहेर निघण्याची संधीच मिळाली नाही. होर्डिंगच्या वजनाने कारचा चेमटली अन् यादव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. यादव यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.

गुन्हा दाखल -

समाजवादी पक्षाचे नेते लाल बहादूर यादव (४८) हे रविवारी दुपारी आपल्या क्रेटा कारने जात होते. त्यावेळी अचानक एक अनियंत्रित हाय-मास्ट पोल (पेट्रोल पंपाचं होर्डिंग) त्यांच्या गाडीवर पडला. यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चौकशी केली जात आहे.

क्रेन बोलवावी लागली -

यादव यांच्या कारवर कोसळले होर्डिंग अतिशय जड होते. उचलून ते बाजूला करणं शक्यच नव्हते. त्यामुळे पोलिसांनी तातडीने क्रेन बोलवून ते होर्डिंग बाजूला केले. होर्डिंग काढण्यासाठी क्रेन बोलवण्यात अतिशय वेळ गेला, त्यामध्येच यादव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रतापगडमध्ये घडलेल्या घटनेचे पडसाद उत्तर प्रदेशमध्ये पडत आहेत. प्रतापगडमध्ये या दुर्घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे. बेजाबजार होर्डिंगमुळे नेत्याचा जीव गेल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MS Dhoni आयपीएलच्या किती सामन्यांना मुकणार? का असणार संघाबाहेर?

Bihar Politics: राजकारणातील सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री देणार CM पदाचा राजीनामा

अमेरिकेत ट्रम्पविरोधात 'नो किंग्स' आंदोलन; 90 लाख नागरीक उतरले रस्त्यावर, कारण काय?

'वेलकम टू हेल' इराणचा अमेरिकेला इशारा, इराणची धमकी, जगाला धडकी

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची पुन्हा चर्चा, दादांच्या राष्ट्रवादीकडून विलिनीकरणाची ऑफर

SCROLL FOR NEXT