Pakistan Bus Accident Saam Tv
देश विदेश

Accident: स्पर्धेसाठी जाताना काळाचा घाला, खेळाडूंच्या बसची व्हॅनला धडक; १५ जणांचा जागीच मृत्यू

Pakistan Bus Accident: पाकिस्तानमध्ये नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भयंकर रस्ते अपघात झाला. खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसने व्हॅनला धडक दिली. या अपघातामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला तर २० पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झालेत.

Priya More

Summary -

  • पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात भीषण रस्ते अपघात झाला

  • खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला जोरदार धडक

  • अपघातामध्ये १५ जणांचा जागीच मृत्यू,

  • अपघातामध्ये २० हून अधिक जण जखमी

पाकिस्तानमध्ये भीषण रस्ते अपघाताची घटना घडली. खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसने महामार्गावर व्हॅनला धडक दिली. या अपघातामध्ये १५ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर २० पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब प्रांतात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अपघाताची ही घटना घडली. फैसलाबाद येथील युनिव्हर्सिटी ऑफ व्हेटरनरी अँड अॅनिमल सायन्सचे विद्यार्थी बुधवारी रात्री बसमधून प्रवास करत होते. हे सर्व विद्यार्थी खेळाडू होते आणि ते एका क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी लाहोरला निघाले होते. पण वाटेतच त्यांच्या बसवर काळाने घाला घातला. लाहोरपासून २०० किमी अंतरावर अड्डा फकीर दी कुल्ली परिसरात खेळाडूंच्या बसची आणि व्हॅनची समोरासमोर जोरदार धडक झाली.

हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये बस आणि व्हॅनचा चक्काचूर झाला. या अपघातामध्ये १५ जणांनी जागीच प्राण सोडले. मृतांमध्ये अनेक खेळाडूंचा समावेश आहे. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. जखमींमधील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे पाकिस्तानमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. हा अपघात नेमका कसा झाला याचा तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : "मला बापाला मरताना नाही पाहायचंय..."; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक, ढसाढसा रडतानाचा VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: कालच्या मुसळधार पावसानंतर नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ७० टक्के भरले

Train Cancelled : प्रवाशांसाठी मोठी बातमी! साईनगर शिर्डी एक्सप्रेससह ८ रेल्वे आज रद्द, नेमकं कारण काय? वाचा

Kidney disease: किडनी खराब होण्याआधी शरीर देतं हे ५ धोकादायक इशारे; क्रिएटिनिन वाढण्याचं खरं कारण जाणून घ्या

Early cancer symptoms: तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजमध्येच का होतं कॅन्सरचं निदान? डॉक्टरांनी सांगितलं यामागचं कारण

SCROLL FOR NEXT