Maha Kumbh Saam Tv
देश विदेश

Maha Kumbh: महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, १० जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी, अमृत स्नान रद्द

Maha Kumbh Tragedy: महाकुंभमेळ्यात अमृत स्नान होणार होते. त्यामुळे या ठिकाणी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. या महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली. त्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरु आहे. महाकुंभमेळ्यातील मौनी अमावस्येनिमित्त संगम तिरावर लाखो भाविक जमले होते. परंतु या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली. या चेंगरीचेंगरी १० भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. त्यामुळे प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यात भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (Maha Kumbh)

महाकुंभमेळ्यात अमृत स्नानासाठी अनेक भाविक आले होते. ही गर्दी खूपच जास्त होती. त्यामुळे तिथे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत १० जण मृत्यूमुखी तर अनेकजण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. या ठिकाणी पोलिसांनी भाविकांना मदत केली आहे. सध्या महाकुंभमेळ्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे तर सर्व आखाड्यांनी अमृत स्नानावर बंदी घातली आहे. त्यामुळे आज अमृत स्नान होणार नसल्याचे सांगितले जात आहे. (Maha Kumbh 2025)

महाकुंभमेळ्यात गर्दी खूप जास्त झाली होती. त्यामुळे भाविकांना श्वास घ्यायलाही त्रास होत होता. त्यामुळे ढकलाढकली सुरु झाली. यामुळे काही भाविकांना बॅरेकेडिंग तोडले. यामुळे गर्दीतील लोक इकडे तिकडे पळत होते. यामुळे चेंगराचेंगरी झाली. त्यात अनेकजण जखमी झाले आहेत.

महाकुंभमेळ्यात जगातील कानाकोपऱ्यातून अनेक लोक येतात. आज नागा साधूंचा दुसरा अमृत स्नान विधी होती. त्यामुळे आज १० कोटी भाविक येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. दरम्यान, चेंगराचेंगरीची घटना घडल्याने अमृत स्नान कार्यक्रम रद्द करण्यात आली आहे. आज कोणताही आखाडा अमृत स्नान करणार नसल्याचे जाहीर केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Changing Room Safety Tips: चेंजिंग रूममध्ये कुठे कुठे असू शकतो छुपा कॅमेरा? कपडे ट्राय करताना 'या' ५ जागा नक्की तपासा

Maharashtra News Live Update: राहुल गांधींची पत्रकार परिषद सुरू

Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून गूड न्यूज! ५ हजार रुपये मदतीसह कर्जमाफीबाबत महत्त्वाचे ८ मोठे निर्णय

PM Kisan Yojana: दसरा की दिवाळी? शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2,000 कधी जमा होणार? PM किसानच्या हप्त्यावर अपडेट समोर

मोठी बातमी! रोहित शर्मा पुन्हा होणार मुंबईचा कर्णधार, हार्दिक पांड्याचा पत्ता कट होणार?

SCROLL FOR NEXT