वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात राहणे आता प्रत्येकासाठी आव्हान ठरत आहे. भारतातील शहरे म्हटलं तर उंच इमारती, वाहतूककोंडी, लोकांची आराडाओरड, धूळ, अस्वच्छता या बाबी आल्याच. यामुळे दिवसेंदिवस शहरात राहणाऱ्या लोकांना परिसरात शांतता, स्वच्छ, शुद्ध हवेची ओढ वाढू लागली आहे. शहरी लोकांच्या या अपेक्षा पूर्ण करणारे देशात काही गावे आहेत. भारतातील ही गावे शांतता, स्वच्छ, शुद्ध हवेसाठी प्रसिद्ध आहेत. आपल्या देशातील या स्वच्छ गावांना नागरिकांनी नक्कीच भेट द्यायला हवी. (Latest Marathi News)c
मीडिया वृत्तानुसार, भारतात अनेक जागा आहेत, त्या निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत. भारतातील काही गावे त्यांच्या स्वच्छतेसाठी खूपच प्रसिद्ध आहेत.
मावलिननांग - मावलिननांग या गावास आशियातील सर्वात स्वच्छ गाव म्हटलं जातं. या गावाला २००३ मध्ये डिस्कव्हर इंडियाद्वारे 'आशियातील सर्वात स्वच्छ गाव' या उपाधीने सन्मानित करण्यात आलं होतं. मावलिनगांगमधील ९५ घरात बांबूपासून कचरापेटी तयारी केली आहे. या कचऱ्यापेटीत घरातील संपूर्ण कचरा एकत्र केला जातो. त्यानंतर एका खड्ड्यात हा कचरा टाकून त्याचा खताच्या रुपात वापर केला जातो. या गावात १०० टक्के लोक सुशिक्षित आहेत. या गावात प्लास्टिक बंदी आहे. या गावात कोणी व्यक्ती धुम्रपान करताना दिसल्यास त्याच्याकडून दंड आकारला जातो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
नाको वैली, हिमाचल प्रदेश - हिमाचल प्रदेशमधील हे नाका वैली गाव तिबेट देशाच्या सीमेजवळ वसलेले हे गाव आहे. या शांत गावात जुने मठ आहे. या गावात बौद्ध लामांकडून एक जुनं मंदिर स्थापन करण्यात आलं आहे. या मंदिराच्या भिंतीवर सुंदर चित्र मनाला भावणारे आहेत. हे गाव स्वच्छतेसाठी खूप प्रसिद्ध आहे.
खोनोमा - हे गाव नागलँडची राजधानी कोहिमापासून जवळपास २० किमी दूर आहे. या गावात ३००० लोक असून हे गाव ७०० वर्षे जुने आहे. या गावात जंगल आणि भाताच्या लागवाडीसाठी प्रसिद्ध आहे.
इडुक्की - इडुक्की केरळमधील गाव खूपच सुंदर आहे. हे गाव शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. या गावातील निसर्ग सौंदर्य मनात घर करणारे आहे. या गावातील रस्ते, जंगल, धबधबे , तलाव लक्ष वेधून घेतो.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.