Arvind Kejriwal Parents Saam Tv
देश विदेश

Arvind Kejriwal: उद्या दिल्ली पोलीस माझ्या वृद्ध आई-वडिलांची चौकशी करण्यासाठी येतायत: अरविंद केजरीवाल

Satish Kengar

उद्या दिल्ली पोलीस माझ्या वृद्ध आई-वडिलांची चौकशी करण्यासाठी येतायत, अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे. त्यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. खासदार स्वाती मालीवाल यांच्या मारहाण प्रकरणी ही चौकशी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या या ट्वीटनंतर आप खासदार संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले आहेत की, ''लढ्याचं आहे तर आमच्याशी लढा. अरविंद केजरीवाल यांच्या वृद्ध आणि आजारी आई-वडिलांना देणे हे तुमच्या क्रूरतेचे आणि भ्याडपणाचे प्रतीक आहे.''

यातच दिल्लीच्या मंत्री आतिषी म्हणाल्या आहेत की, "अरविंद केजरीवाल यांच्या पालकांची चौकशी करण्यासाठी पंतप्रधान मोदी उद्या दिल्ली पोलिसांना पाठवत आहेत. मला पंतप्रधान आणि भाजपला विचारायचे आहे की, 80-85 वर्षांचे ते दोन वृद्ध, जे आधाराशिवाय चालू शकत नाहीत. बराच वेळ हॉस्पिटलमध्ये घालवून काही दिवसांपूर्वी घरी परतलेल्या आईला 85 वर्षांच्या वृद्धांनी स्वाती मालीवाल यांच्यावर हात उचलला असेल, असे पंतप्रधान मोदींना वाटते का?'''

दिल्लीत भाजपला एकही जागा मिळवता येणार नाही, असा दावा आतिशी यांची केला. अरविंद केजरीवाल तुरुंगातून आल्यापासून भाजपमध्ये घबराट पसरली आहे, असंही त्या म्हणाल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

Shukra Nakshatra Gochar: शुक्र ग्रहाने नक्षत्रामध्ये केला बदल; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Politics: हरियाणाची पुनरावृत्ती होणार, राज्यात महायुतीचे सरकार येणार: CM एकनाथ शिंदेंना विश्वास

SCROLL FOR NEXT