Swati Maliwal: स्वाती मालीवाल प्रकरणी ९ दिवसांनी अरविंद केजरीवाल यांनी सोडलं मौन, केला मोठा खुलासा

Arvind Kejriwal On Swati Maliwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अखेर स्वाती मालीवाल यांच्या मुद्द्यावर आपले मौन सोडलं आहे.
स्वाती मालीवाल प्रकरणी ९ दिवसांनी अरविंद केजरीवाल यांनी सोडलं मौन, केला मोठा खुलासा
Arvind Kejriwal On Swati MaliwalSaam Tv
Published On

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अखेर स्वाती मालीवाल यांच्या मुद्द्यावर आपले मौन सोडलं आहे. आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार मालीवाल यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मारहाण केल्याच्या आरोपावर केजरीवाल यांनी आपली प्रतिक्रिया देत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी, असं म्हटलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, या घटनेच्या दोन बाजू आहेत.

दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी आरोप केला आहे की, 13 मे रोजी सकाळी त्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या. तेव्हा मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय बिभव कुमार यांनी त्यांच्यावर हल्ला केला. मुख्यमंत्र्यांच्या ड्रॉईंग रूममध्ये आपल्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप मालीवाल यांनी केला आहे.

स्वाती मालीवाल प्रकरणी ९ दिवसांनी अरविंद केजरीवाल यांनी सोडलं मौन, केला मोठा खुलासा
Lok Sabha Election: भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ज्ञांनी वर्तवला अंदाज

गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी बिभव कुमारला अटक केली आहे. त्याचवेळी बिभव कुमार यांनीही पोलिसांकडे तक्रार दिली आणि सांगितले की, मालीवाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात जबरदस्तीने प्रवेश केला आणि त्यांना थांबवल्यावर धक्काबुक्की करण्यात केली.

'या घटनेबाबत दोन बाजू आहेत'

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत अरविंद केजरीवाल म्हणाले की, 'हे प्रकरण अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे आणि त्यांच्या वक्तव्याचा कारवाईवर परिणाम होऊ शकतो.' केजरीवाल म्हणाले, 'पण मला आशा आहे की, योग्य तपास होईल. न्याय मिळाला पाहिजे. या घटनेबाबत दोन बाजू आहेत. पोलिसांनी दोन्ही पक्षांची योग्य चौकशी करून न्याय द्यावा.

स्वाती मालीवाल प्रकरणी ९ दिवसांनी अरविंद केजरीवाल यांनी सोडलं मौन, केला मोठा खुलासा
Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरात पाणीबाणी! जिल्ह्यात 678 टँकरने पाणीपुरवठा सुरू, टंचाईग्रस्त भागात बांधकामांना स्थगिती

घटनेच्या वेळी ते त्यांच्या शासकीय निवासस्थानी उपस्थित होते का, असे विचारले असता? केजरीवाल यांनी आपण घरी असल्याचे मान्य केले. ते म्हणाले, 'पण मी घटनास्थळी नव्हतो.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com