Lok Sabha Election: भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ज्ञांनी वर्तवला अंदाज

BJP News: लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत पाच टप्पे पार पडले आहेत. तर दोन टप्प्यांचे मतदान बाकी आहे. एनडीए आणि इंडिया आघाडी हे दोन्ही पक्ष आपापले सरकार स्थापन करण्याचा दावा करत आहेत.
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ज्ञांनी वर्तवला अंदाज
PM Modi, Amit Shah, J. P. NaddaSAAM TV

लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत पाच टप्पे पार पडले आहेत. तर दोन टप्प्यांचे मतदान बाकी आहे. एनडीए आणि इंडिया आघाडी हे दोन्ही पक्ष आपापले सरकार स्थापन करण्याचा दावा करत आहेत. याच दरम्यान, अमेरिकेतील एका प्रसिद्ध राजकीय तज्ज्ञाने एक मोठा दावा केला आहे.

इयान ब्रेमर यांनी एनडीटीव्ही प्रॉफिटला एका मुलाखतीत सांगितले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप 315 जागा जिंकेल. ब्रेमर हे युरेशिया ग्रुपचे संस्थापक आहेत आणि जगभरातील निवडणुकांवरही त्यांचे बारीक लक्ष असते.

भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ज्ञांनी वर्तवला अंदाज
Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरात पाणीबाणी! जिल्ह्यात 678 टँकरने पाणीपुरवठा सुरू, टंचाईग्रस्त भागात बांधकामांना स्थगिती

भारतात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुका आणि त्यांच्या अंदाजाबाबत विचारले असता ब्रेमर म्हणाले की, युरेशिया ग्रुपच्या संशोधनावरून भाजप 295-315 जागा जिंकेल. मोदी गेल्या दहा वर्षांपासून पंतप्रधान आहेत आणि 2014 मध्ये भाजपला 282 तर 2019 मध्ये 303 जागा मिळाल्या होत्या.

ब्रेमर म्हणाले, "मला जगातील सर्व निवडणुकांमध्ये स्वारस्य आहे (युरोपियन युनियनमधील निवडणुका आणि शक्यतो, ब्रिटनमधील राष्ट्रीय निवडणुका). मजबूत आर्थिक कामगिरी आणि चांगल्या धोरणांमुळे मोदी तिसऱ्यांदा नक्कीच विजयी होणार आहेत, असं ते म्हणाले.

भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ज्ञांनी वर्तवला अंदाज
Who is Vishal Agarwal: प्रसिद्ध बिल्डर ते 600 कोटींची संपत्ती, कोण आहेत विशाल अग्रवाल?

दरम्यान, भारतीय राजकीय रणनीतीज्ञ प्रशांत किशोर यांनीही असा दावा केला आहे की, केंद्रातील सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारबद्दल कोणताही विशेष असंतोष नाही किंवा 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पर्यायाची कोणतीही जोरदार मागणी नाही. 'एनडीटीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीतप्रशांत किशोर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला आणखी एक विजय मिळवून देऊ शकतात. भाजपच्या जागांची संख्या 2019 च्या जवळपास किंवा त्याहूनही जास्त असू शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com