Tomato Price Hike: बाजारात टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहे. देशातील काही भागात टोमॅटोचे दर २०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. राजधानी दिल्लीत बुधवारी मदर डेअरी दुकानांवर टोमॅटोचे दर २५९ रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहे. आता लवकरच टोमॅटोचे दर हे ३०० रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)
राजधानी दिल्लीतील मदर डेअरीच्या स्टोर्सवर बाजारात टोमॅटोची किंमत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्र्याच्या आकड्यानुसार, बुधवार २ ऑगस्ट २०२३ टोमॅटोची किंमत २०२३ रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
जुलै महिन्यात टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहे. तसेच अनेकांच्या स्वयंपाक घरातून टोमॅटो गायब झाला आहे. चंडीगड, उत्तराखंड आणि दिल्ली येथील काही किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर ३०० रुपयापर्यंत पोहोचले होते.
पीटीआयच्या माहितीनुसार, मदर डेअरीचे प्रवक्ते म्हणाले की, वातावरणातील बदलामुळे गेल्या दोन महिन्यांपासून टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत'.
सर्वसामान्यांनी टोमॅटोला शोधला पर्याय
बाजारात टोमॅटोचे दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. टोमॅटोचे दर वाढल्याने सर्वसामान्य टोमॅटोला पर्याय म्हणून भाजीसाठी केचप वापरत आहेत. लोक बाजारात २०० ते १०० रुपयांचं टोमॅटो खरेदी करण्याऐवजी केचप वापरत आहेत.
छत्तीसगडच्या रायगढ येथील हॉटेल संचालक शंकरलाल चावला यांचं म्हणणं आहे की, टोमॅटोचे दरात वाढल्याने बजेट बिघडलं आहे. बाजारातील टोमॅटो केचपचा वापर करून हॉटेलमध्ये जेवण केलं जात आहे'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.