Tomato Fever Virus Saam Tv
देश विदेश

अरे बापरे! कोरोनानंतर आता टोमॅटो फिव्हरचा धुमाकूळ; आतापर्यंत 80 मुलांना संसर्ग

Tomato Fever Virus : केरळमध्ये टोमॅटो फिव्हर नावाचा आजाराने धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे

साम टिव्ही ब्युरो

केरळ : एकीककडे संपूर्ण जग कोरोना महामारीसोबत (Coronavirus) लढा देत असताना दुसरीकडे नवनवीन आजारांनी डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. सुरूवातीला कोरोना, त्यानंतर मंकीपॉक्स आणि आता एका टोमॅटो फिव्हर (Tomato Fever) नावाच्या आजारानं डोकं वर काढलं आहे. ऐकून धक्का बसेल, पण केरळमध्ये टोमॅटो फिव्हर (Tomato Fever in Kerala) नावाचा आजाराने धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. अनेक भागात या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. हा व्हायरस विशेषता लहान मुलांना या आजाराचा संसर्ग होत आहे. (Tometo Fever Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, केरळमध्ये आतापर्यंत 80 मुलांना टोमॅटो व्हायरसची (Tomato Fever in Kids) लागण झाली आहे. टोमॅटो फिव्हरची पुष्टी झाल्यानंतर तामिळनाडूमध्येही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तामिळनाडूने केरळच्या सीमेवरील जिल्हे आणि गावांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, टोमॅटो फिव्हरच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ होत असल्याने सीमावर्ती भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर केरळनेही तामिळनाडू सीमेवरून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सुरूवातीला या फिव्हरची रुग्ण केरळमधील आर्यंकावू, आंचल आणि नेदुवाथुर या भागात आढळून आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रुग्ण आढळून येताच आरोग्य प्रशासन सतर्क झाले असून आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी केरळपासून दक्षिण कन्नड, उडुपी, कोडागु, चामराजनगर आणि म्हैसूर येथे जाणाऱ्या दैनंदिन प्रवाशांवर कडक नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. केरळ व्यतिरिक्त इतर कोणत्याही राज्यात या आजाराचा प्रसार झाल्याची माहिती मिळालेली नाही. या आजाराची लागण झालेल्या बालकांच्या अंगावर टोमॅटोसारखे गोल पुरळ व पुरळ उठत आहे.

टोमॅटो फिव्हरची लक्षणे काय?

लहान मुलांना खूप ताप येतो, शरीरावर आणि चेहऱ्यावर लाल पुरळ किंवा पुरळ उठणे. हे पुरळ अंगठ्यासारखे किंवा टोमॅटोसारखे मोठे होऊ शकतात. संसर्ग झाल्यावर रुग्णाच्या शरीरात वेदना होतात आणि सांध्यांना सूज येऊ लागते. याशिवाय हात, कंबर आणि गुडघ्यांचा रंग बदलू लागतो, त्वचेवर जळजळ होणे, खाज सुटणे, तापासोबत अशी लक्षणे दिसू लागल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा,

टोमॅटो फिव्हरवर उपचार काय?

सध्यातरी या फिव्हरवर कोणताही उपचार नाहीये. पण तरीही प्राथामिक या आजारापासून बचाव करायचा असेल तर, भरपूर पाणी पिणे, वारंवार कोमट पाण्याने अंघोळ करणे, स्वच्छतेची काळजी घेणे, लहान मुलांमध्ये हा आजार अधिक पसरत असल्याने मुलांमध्ये उठलेल्या पुरळांवर ओरखडे पडणार नाहीत याची विशेष काळजी घ्यावी, असं न केल्यास हा आजार पुढे पसरू शकतो. इतर लोकांना, विशेषतः लहान मुलांना, संक्रमित रुग्णांपासून दूर ठेवावे. नेहमी उकळलेले पाणी प्यावे. बेडशीट आणि उशा दररोज बदलल्या पाहिजेत. ज्या ठिकाणी लहान मुले झोपतील ते बेड स्वच्छ ठेवा.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT