मुंबई: कोरोना महामारी आटोक्यात आली असली तरी आता राज्यात कोविडच्या केसेस हळूहळू वाढत आहेत. अशात महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सच्या (Covid-19 Task Force) तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. (Covid-19 crisis on Maharashtra is growing; Important advice given by the experts of the taskforce)
महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर राहुल पंडित (Dr. Rahul Pandit, Covid-19 Task Force) म्हणाले की, जानेवारी-फेब्रुवारीप्रमाणे कोरोना केसेस वाढण्याच्या प्रमाणात फार तफावत आहे. कोविड नियमांची सक्ती करणं हा प्रशासकीय निर्णय आहे, परंतु प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी आणि सेल्फ मस्किंग (Mask) करणे गरजेचे आहे असं ते म्हणाले.
हे देखील पाहा -
पुढे ते म्हणाले की, प्रत्येकालाच त्याची हेल्थ हॅबिट लावणं गरजेचं आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र कोविड (covid-19) टास्कफोर्स चे सदस्य डॉक्टर राहुल पंडित यांनी दिली आहे. त्यामुळे सध्या राज्यात कोरोना रुग्णसंख्या कमी गतीने वाढत असली तरी कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, राज्यात कोरोना रुग्णसंख्येत सौम्यगतीने वाढ होत आहे. रुग्णवाढीमुळे चौथी लाट येण्याची आशंका व्यक्त केली जातेय. मात्र सध्या चौथी लाट येईल अशी कोणतीही चिन्हं नाहीत, असा दिलासा त्यांनी दिला आहे.
दरम्यान देशात गेल्या २४ तासांमध्ये २,८९७ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर एकूण रुग्णसंख्या ही ४,३१,१०,५८६ वर पोहोचली आहे. याच सक्रिय रुग्णांची संख्या (Corona Patient) १९,४९४ वर आली आहे. कारोनामुळे गेल्या चोवीस तासांत ५४ रुग्ण दगावले आहेत. (India Corona Updates 12th May 2022)
आतापर्यंत एकूण मृतांची संख्या ५,२४,१५७ वर पोहोचली आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. एकूण संक्रमणांपैकी ०.०५ टक्के सक्रिय रुग्ण आहेत, तर बरे होण्याचा दर ९८.७४ टक्के आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने (Corona Updates) दिली आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.