Petrol Diesel Price
Petrol Diesel Price  Saam Tv
देश विदेश

Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ सुरूच; पेट्रोल-डिझेलचे दरही वाढणार?

वृत्तसंस्था

Petrol Diesel Price : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दारातही काही बदल करण्यात आले आहे. आज यूपी आणि बिहारमधील अनेक शहरांमध्ये इंधनाचे दर बदलले आहेत. मात्र, दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चारही महानगरांमध्ये आजही पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, बिहारची राजधानी पटना येथे पेट्रोल 64 पैशांनी स्वस्त होऊन 107.48 रुपये प्रति लिटर झाले आहे, तर डिझेल 13 पैशांनी वाढून 95.54 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर (नोएडा-ग्रेटर नोएडा) जिल्ह्यात आज पेट्रोल 34 पैशांनी महागले आहे आणि ते 96.92 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे, तर डिझेल 33 पैशांनी महागून 90.08 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. गाझियाबादमध्ये आज पेट्रोल 32 पैशांनी घसरून 96.26 रुपये प्रति लिटर तर डिझेल 30 पैशांनी घसरून 89.45 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. (Tajya News)

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Lok Sabha: मुंबईत आज पॉलिटिकल ब्लॉकबस्टर; शिवाजी पार्कवर PM मोदी अन् राज ठाकरे, तर बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तीप्रदर्शन

Rashi Bhavishya: आज 'या' राशींवर शनीदेवाची कृपा, पैशाची आवक वाढेल

Daily Horoscope: कष्टाला पर्याय नाही, 'या' ३ राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ मिळणार; तुमच्या राशीत काय?

Maharashtra Election: लोकसभा निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात अस्तित्वाचं 'राज'कारण

Maharashtra Election: नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅगांचं चेकिंग; चेकिंग नव्हे स्टंटबाजी, ठाकरे गटाचा आरोप

SCROLL FOR NEXT