west bengal  Saam tv
देश विदेश

माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; खासदाराने तडकाफडकी दिला पदाचा राजीनामा

mamata banerjee News : माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का बसलाय. पक्षातील आणखी एका खासदाराने तडकाफडकी पदाचा राजीनामा दिला आहे.

Vishal Gangurde

माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पुन्हा धक्का

आणखी एका खासदाराने साथ सोडली

कोयल मल्लिक यांच्या राजीनाम्याने राजकीय घडामोडींना वेग

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. तीन खासदारानंतर आता आणखी एका खासदार महिलेने राजीनामा दिला आहे. राज्यसभा खासदार कोयल मल्लिक असे राजीनामा देणाऱ्या खासदाराचे नाव आहे.

पश्चिम बंगालमध्ये सुखेंदू शेखर रे, सुष्मिता देव आणि प्रकाश चिक बराइक यांनी आधीच पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर कोयल मल्लिक यांनीही राजीनामा दिलाय. त्यांनी पक्षातील सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय का, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या पक्षाची पडझड सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तीन डझनहून अधिक आमदारांनी ममता बॅनर्जी यांच्यापासून दूर होण्याचा निर्णय घेतला. त्यानतंर एक डझन लोकसभा खासदारांनी काकोली घोष दास्तीदार यांच्या नेतृत्वात ममता बॅनर्जी यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला.

१३ राज्यसभा खासदारांच्या साथीने केंद्र सरकारवर लक्ष्य करण्यास निघालेल्या ममता बॅनर्जी यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. आता राज्यसभा खासदारांनीही ममता बॅनर्जी यांचं टेन्शन वाढवलं आहे. सर्वात आधी शुखेंदु शेखर रे यांनी ८ जून रोजी राजीनामा दिला. आतापर्यंत एकूण ४ खासदारांनी राजीनामा दिला आहे.

ममता बॅनर्जी यांनी अभिनेत्री कोयल मल्लिक यांना या वर्षी एप्रिल महिन्यात राज्यसभेवर पाठवलं होतं. राज्यसभा खासदारकीच्या शपथ घेताना भरपूर आनंदी दिसत होत्या. त्यावेळी देशसेवा करणार असल्याची प्रतिक्रिया दिली होती.

कोण आहेत कोयल मल्लिक?

पश्चिम बंगालच्या इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री कोयल मल्लिक यांचं खरं नाव रुक्मिणी मल्लिक आहे. अभिनेते रंजीत मल्लिक यांच्या घरी जन्माला आलेल्या कोयल यांनी सिनेसृष्टीतच काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. २००३ साली 'नाटेर गुरु' नावाच्या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. तरुणांमध्ये प्रसिद्ध असलेल्या कोयल यांना ममता बॅनर्जी यांनी एप्रिल २०२६ रोजी राज्यसभेवर पाठवलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT