Tirupati Fire  ANI
देश विदेश

Tirupati Fire: 10 कोटींच्या फोटो फ्रेम जळाल्या, तिरुपतीमध्ये मंदिराजवळ भीषण अग्नितांडव

Andhra Pradesh Breaking News: अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

Priya More

Andhra Pradesh: आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) तिरुपतीमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. गोविंदराजा स्वामी मंदिराजवळ (govindraja swami temple) ही भीषण आग लागली आहे. मंदिर परिसरातील एका फोटो फ्रेमच्या दुकानाला ही भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तिरुपतीमधील गोविंदराजा स्वामी मंदिराजवळ असलेल्या फोटो फ्रेमवर्कच्या दुकानाला दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. गजबजलेल्या या मंदिर परिसरातील या दुकानाला लागलेल्या भीषण आगीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही आग लागल्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. सुरुवातीला दुकानाला लागलेली ही आग आता तीन मजली इमारतीवर देखील पसरली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पण रस्ते अरुंद असल्यामुळे आग विझवण्यात अडथळे येत आहेत.

आग लागलेल्या फोटो फ्रेमच्या दुकानात जवळपास 10 कोटींच्या फोटो फ्रेम्स आहेत असे सांगितले जात आहे. दुकानाला लागलेली आग पसरत चालली आहे. याआगीमध्ये गोविंदाराजा स्वामी मंदिराच्या रथमंडपापर्यंत पोहचली आहे. या आगीमध्ये महारथही पेटला आहे. आग लागल्यामुळे मंदिरात आलेल्या भाविकांची पळापळ झाली. ही आग इतकी वाढत चालली आहे की आसपासच्या घरांना देखील नुकसान होण्याची भीती आहे.

एका दुकानाला लागलेल्या या आगीमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. तीन मजली इमारतीला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. ही भीषण आग पाहून आजूबाजूला राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिसरामध्ये धुराचे लोट पसरले आहेत. या आगीमध्ये फोटो फ्रेमवर्कचे दुकान जळून खाक झाले. या आगीमध्ये मोठे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Traffic : घोडबंदर रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढली; जाणून घ्या कारण

Gokak Waterfalls: सांगलीपासून २ तासांच्या अंतरावर आहे 'हा' धबधबा; गर्दी नको असेल तर आहे परफेक्ट डेस्टिनेशन

Nag Panchami 2025: नागपंचमीला शिवलिंगावर या ३ गोष्टी अर्पण केल्याने दूर होतात संकटं

Dhadgaon News : अंगणवाडी मदतनीस पदावर नियुक्त महिलेला मारहाण; नंदुरबार जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Coconut Water: नारळ पाणी प्यायल्यानंतर 'या' गोष्टी खाणं टाळा, नाहीतर...

SCROLL FOR NEXT