Mumbai News: ‘राष्ट्रात मोदी अन् महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात वर्तमान पत्रांमध्ये छापून आणली होती. या जाहिरातीवरून राज्यात वाद सुरु आहे. सरकारकडून सुरु असलेल्या या जाहिरात आणि बॅनरबाजीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी टीका केली आहे. 'सत्तेत असलेले नेते जाहिरात आणि बॅनरबाजीत अडकत असतील तर दुर्दैवी आहे', अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, 'हे खूपच दुर्दैवी आहे. आपण हे हसण्यावारी घेत आहोत. पण पक्ष आणि सत्तेत असलेले ऐवढे मोठे नेते जाहिरात आणि बॅनरबाजीत अडकत असतील तर या राज्याचे काम कुठल्या दिशेने चालेल?, महाराष्ट्र नक्की कोण चालवतंय?', असा सवाल सुप्रिय सुळे यांनी केला आहे.
तसंच, हे सगळे तूतू मेमे, तू काय बोलला, मी काय बोलला. मी कुठला बॅनर लावला. मी कोणाचा अपमान केला. मी तुला कसा खाली दाखवतो. मी तुला कसा कॅबिनेटमधून बाहेर काढतो यामध्ये व्यस्त आहेत. यामध्येच तर ते असतील तर महाराष्ट्रात काम थांबले आहे. बाकीच्या कामामध्येच सर्व व्यस्त आहेत.', अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
'मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अवैध पोस्टर गावभर लावणार असतील तर हे दुर्दैवी आहे. अवैध पोस्टर थांबले पाहिजेत.', असे मत त्यांनी व्यक्त केले. 'महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार महिला सुरक्षेबाबत असंवेदनशील आहे. महाराष्ट्रात अनेक रॅकेट सुरू आहेत. निवडणूक अजून झाल्या नाहीत. महाराष्ट्र नक्की कोण चालवते?', असा सवाल त्यांनी केला आहे.
दरम्यान, विरोधकांवर टीका करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 'चेहरा मत देणार की पॉलिसी मत देणार? कोणत्या योजना आल्या किती निधी आले. किती एम्स आले किती ऑप्रेशनल आहेत?, मेन पॉलिसी काय? हे महत्वाचे आहे. महाराष्ट्रात पॉलिसी परेलीसिसी आहे.', अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकार लोकशाहीपासून दूर जात असल्याची देखील टीका केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.