Mumbai School News
Mumbai School NewsSaam Tv

Mumbai School News : कांदिवलीत शाळेत अजान लावण्याचा प्रयत्न, पालक-शिवसैनिकांच्या संतापानंतर शाळेचा मोठा निर्णय

Mumbai News : कांदिवली पश्चिमेकडील महावीर नगर येथील कपोल विद्यानिधी शाळेमध्ये हा प्रकार घडला आहे.
Published on

संजय गडदे

Mumbai News : यंदाचं शैक्षणिक वर्ष सुरु होऊन दोनच दिवस झाले. मात्र शाळांमध्ये नेमकं काय चाललंय असा प्रश्न आता निर्माण होत आहे. काल वाशी येथील एका शाळेत 'जय श्रीराम'च्या घोषणांवरुन वाद निर्माण झाला होता. तर आज कांदिवलीतील एका शाळेत अजानवरुन वाद निर्माण झाला आहे.

कांदिवली पश्चिमेकडील महावीर नगर येथील कपोल विद्यानिधी शाळेमध्ये विद्यार्थ्यांसमोर अजान वाजवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विद्यार्थ्यांनी घडलेला प्रकार घरी सांगितल्यानंतर पालकांनी आक्रमक पवित्रा घेतला. (Crime News)

Mumbai School News
Pune Crime News: उच्चशिक्षित तरुणीला इंटरव्यूसाठी बोलावलं अन्... धक्कादायक घटनेनं पुणे हादरलं

पालक आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आज शाळेत जात याबाबत शाळेला जाब विचारला आहे. या संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी देखील शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.  (Latest Marathi News)

Mumbai School News
Bangladeshi Arrest in Mumbai : अवैधरित्या मुंबईत राहणाऱ्या बांग्लादेशी नागरिकाला अटक, मालवणी पोलिसांची कारवाई

पालकांनी आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी शाळेच्या आवारात जात जोरदार घोषणाबाजी केली आहे. पालकांच्या विरोधानंतर शाळेने माफी देखील मागितली आहे.

आम्ही सर्व धर्मियांच्या प्रार्थना लावतो असं स्पष्टीकरण देखील शाळेनं दिलं आहे. मात्र पालक आणि शिंदे गटाच्या आक्रमक पवित्र्यानंतर कांदिवलीच्या कपोल विद्यानिधी शाळेत अजान लावणाऱ्या शिक्षिकेला निलंबित करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com