THREE-TIME MLA RAM LALIT CHAUDHARY DIES DURING TREATMENT IN LUCKNOW saam tv
देश विदेश

3 वेळा आमदार राहिलेल्या दिग्गज नेत्याचे निधन; राजकारणात शोककळा

Ram Lalit Chaudhary Three Time MLA Death News: उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील रामनगरचे तीन वेळा आमदार राहिलेले ज्येष्ठ नेते राम ललित चौधरी यांचे लखनऊ येथे उपचारादरम्यान निधन झाले.

Omkar Sonawane

उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील रामनगर विधानसभा मतदारसंघाचे तीन वेळा आमदार राहिलेले ज्येष्ठ राजकीय नेते राम ललित चौधरी यांचे लखनऊ येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच रामनगर मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली. राम ललित चौधरी हे साऊंटघाट विकासखंडातील परसा लाल शाही गावचे रहिवासी होते. त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात विद्यार्थी राजकारणातून केली. याच काळात त्यांचा माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या संपर्कात आले. त्यानंतर ते चौधरी चरण सिंह यांचे निकटवर्तीय सहकारी म्हणून अनेक वर्ष काम पाहिले. चौधरी चरण सिंह पंतप्रधान असताना राम ललित चौधरी यांनी त्यांचे खासगी सहाय्यक (PA) म्हणूनही काम केले.

राजकारणात सक्रिय भूमिका घेतल्यानंतर जनता दलाने 1989 मध्ये रामनगर विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली. त्यांनी ही निवडणूक जिंकत पहिल्यांदा विधानसभा गाठली. त्यानंतर 1991 मध्ये जनता दलाच्या तिकिटावर ते पुन्हा रामनगरमधून आमदार म्हणून निवडून आले.यानंतर त्यांनी बहुजन समाज पक्षात (बसपा) प्रवेश केला. 1996 च्या विधानसभा निवडणुकीत बसपाच्या तिकिटावर त्यांनी रामनगर मतदारसंघातून विजय मिळवत तिसऱ्यांदा आमदारकी मिळवली.

2023 पासून राम ललित चौधरी हे सुहेलदेव भारतीय समाज पक्षाशी (सुभासपा) जोडले गेले होते. सध्या ते पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत होते. दीर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांनी रामनगर आणि परिसराच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.

15 दिवसांपूर्वी पडल्याने झाली होती दुखापत

15 दिवसांपूर्वी ते घसरून पडले होते. या दुर्घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी लखनऊ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli Bus Accident: अचानक नियंत्रण सुटलं अन् ST बस उलटली; शिवणी नदी पुलावर मोठा अपघात

Brain Facts : दुसऱ्याला जांभई देताना पाहिल्यावर आपल्यालाही जांभई का येते? 'ही' ६ कारणे वाचा

Pune : भव्य दरवाजे अन् मजबूत दगडी तट; पुण्यात लपलंय एक ऐतिहासिक ठिकाण, लोकेशन आताच नोट करा

Maharashtra News Live Update: पुणे फेस्टिवलचे आज उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्याहस्ते उद्घाटन

Bihar Politics: माजी मुख्यमंत्र्यांना काँग्रेसकडून ऑफर, भाजपचं टेन्शन वाढलं

SCROLL FOR NEXT