accident Saam tv
देश विदेश

Srinagar Road Accident : श्रीनगरची चारधाम यात्रा शेवटची ठरली; अकोल्यातील ३ भाविकांचा भीषण अपघातात मृत्यू

Srinagar accident update : अकोल्यातील तिघांची श्रीनगरची चारधाम यात्रा शेवटची ठरली आहे. अकोल्यातील ३ भाविकांचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघाताने अकोल्यातील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Vishal Gangurde

अक्षय गवळी, साम टीव्ही प्रतिनिधी

अकोला : अकोल्यातून चारधाम यात्रेसाठी गेलेल्या तिघांवर काळाने घाला घातला आहे. श्रीनगरमध्ये झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातातील मृतांमध्ये दोन महिलांसह एका पुरुष भाविकांचा समावेश आहे. तिघांच्या मृत्यूने तेल्हारा येथील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथील चारधाम यात्रेसाठी गेलेल्या भाविकांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. श्रीनगर येथे ट्रक आणि कारच्या अपघातात तिघेजण ठार झाले आहेत. मृतांमध्ये अकोल्यातील दोन महिलांसह एका पुरूषाचा समावेश आहे. अमरनाथचं दर्शन करून आले. त्यानंतर श्रीनगरमध्ये त्यांचा अपघात झाला.

अपघातात तेल्हारा शहरातील भैय्या किराणावाले यांच्या घरातील दोन महिलांचा समावेश आहे. तसेच या अपघातात चार जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातातील जखमींवर श्रीनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याने तेल्हारा गावात शोककळा पसरली आहे.

साताऱ्यात एसटीचा अपघात

पुणे बेंगळरु महामार्गावर एसटीचा अपघात झाला. सातारा जिल्ह्यातील पाचवड या ठिकाणी अपघाताची घटना घडली. पुण्यावरून बस कोल्हापूरच्या दिशेने चालली होती. पलूस डेपोच्या एसटी बसला अचानक आग लागली एसटीला आग लागल्यानंतर एका दुचाकीलाही आग लागली. या दुर्घटनेत दुचाकीवरील व्यक्ती आगीत होरपळला. या व्यक्तीविषयी अद्याप अधिक माहिती मिळू शकली नाही. एसटी बसच्या आगीच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील आणखी एक पूल पाण्याखाली

Pune Crime News : पुणे हादरलं !सासरवाडीत जाऊन पतीने केली पत्नीची हत्या; धक्कादायक कारण समोर

Shengdana Chikki: श्रावणात खास बनवा शेंगदाणा चिक्की, महिनाभर खाता येईल

Raigad To Arnala Fort: रायगड किल्ल्यावरून अर्नाळा किल्ल्यापर्यंत प्रवास कसा कराल? जाणून घ्या प्रमुख टप्पे आणि टिप्स

Nag Panchami 2025: नाग पंचमीला घरी पूजा कशी करावी?

SCROLL FOR NEXT