आजपासून बँकिंग व्यवहारात होणार ‘हे’ बदल, जाणून घ्या ग्राहकांवर काय परिणाम होणार? Saam Tv
देश विदेश

आजपासून बँकिंग व्यवहारात होणार ‘हे’ बदल, जाणून घ्या ग्राहकांवर काय परिणाम होणार?

आजपासून तुमच्या बँकिंग व्यवहार विषयी अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : आज वर्षाचा पहिला दिवस आहे. आजपासून तुमच्या बँकिंग (Banking) व्यवहार विषयी अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे. काही नियम हे ग्राहकांच्या फायद्याचे आहेत, तर काही नियमांमुळे ग्राहकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावे लागणार आहे. आजपासून नेमके कोणते नियम बदलणार आहेत. याचा मग ग्राहकांवर काय परिणाम होणार आहे. हे आज आपण माहित करून घेणार आहोत.

सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे आता बँकांना (bank) ग्राहकांनी लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तुंची संपूर्ण जबाबदारी घ्यावी लागणार आहे. तसेच आजपासून ऑनलाईन (Online) फुड डिलेव्हरीकरिता तुम्हाला जादा पैसे मोजावे लागणार आहेत. नव्या वर्षात हा सर्वात महत्त्वाचा आणि सकारात्मक बदल आहे. याअगोदर जर एखाद्या ग्राहकाची वस्तू बँकेच्या लॉकरमधून (locker) चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही ग्राहकांची आहे.

हे देखील पहा-

संबंधित बँकेकडून ग्राहकाला कोणती देखील नुकसान भरपाई मिळत नव्हती. मात्र आरबीआयने जारी केलेल्या नव्या नियमानुसार आता लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तुची संपूर्ण जबाबदारी ही बँकेची असणार आहे. लॉकरमधून एखादी वस्तू चोरीला गेल्यास ग्राहकाला संपूर्ण भरपाई मिळणार आहे. याला अपवाद म्हणेज एखादे नैसर्गिक संकट जसे भूकंप (Earthquake), अतिवृष्टी, आग यामुळे जर नुकसान झाले असले तर संबंधित ग्राहकांना मात्र कोणतीही नुकसाई भरपाई मिळणार नाही.

आजपासून हा एक आणखी महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. प्रत्येक बँकेने आपल्या ग्राहकांना फ्री ट्राझेक्शनची मर्यादा ठरून दिली आहे. त्यापेक्षा जास्त वेळा एटीएम (ATM) मधून पैसे काढल्यास प्रत्येक ट्राझेक्शनवर बँकेकडून त्यांच्या नियमाप्रमाणे चार्ज आकारला जाणार आहे. या नियमाने ग्राहकांना आर्थिक फटका बसण्याची सर्वात जास्त शक्यता आहे.

ऑनलाईन फूड डिलेव्हरी (Food delivery) कंपन्या असलेल्या स्विगी, झोमॅटो (Zomato) सारख्या कंपन्यांना देखील आता जीएसटीच्या कक्षेत आणण्यात आले आहे. यामुळे आजपासून ऑनलाईन फूड महागणार आहे. ऑनलाईन फूडची ऑडर (Order) देताना ग्राहकांना आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अमेरिकेत पुराचा हाहाकार! 50 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: पंढरपुरात जूनी इमारत कोसळली

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

Muharram : मोहरमच्या आनंदावर विरजण, आगीत हनुमंतचा मृत्यू; काळजात धस्स करणारी घटना

SCROLL FOR NEXT