Viral Video
Viral Video Saamtv
देश विदेश

Viral Video: चक्क घोड्यावरुन आला अन् बॅग हिसकावून पळाला, हटके स्टाईल चोरीचा स्टंट पाहून लावाल डोक्याला हात; VIDEO तुफान VIRAL

Gangappa Pujari

Thief On Horse Viral Video: सध्या चोरी (Thief) करण्याच्या अनोख्या शक्कल चोर लढवत असतात. अशा हटके चोरीच्या बातम्या आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतात. कधी धुमस्टाईल चोरी, तर कधी चालता चालता केलेल्या हातसफाईच्या असंख्य घटना तुम्ही पाहिल्या असतील, किंवा ऐकल्या असतील. मात्र सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्याच चोरीच्या घटनेची चर्चा होताना दिसत आहे.

या चोराने चोरी करण्यासाठी बाईक किंवा कारचा नव्हेतर चक्क घोड्याचा वापर केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काय आहे या व्हायरल व्हिडिओमागील कथा, चला जाणून घेवू. (Latest Marathi News)

आजकाल चोर, दरोडेखोरांची दहशत चांगलीच वाढल्याचे पाहायला मिळत आहे. रात्री, दिवसाढवळ्या होणाऱ्या चोऱ्यांचंही प्रमाण अधिक झालं आहे. त्यामुळे लोकांच्या मनात चोरांची भीती वाढत चालली आहे. चोरीच्या अनेक धक्कादायक घटना आणि त्यांचे व्हिडीओ समोर येत असतात. सध्या अशाच एका चोरीच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडिओमधील (Viral Video) चोर चक्क घोड्यावरुन येत चोरी करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. चोराच्या चोरीची ही हटके स्टाईल पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला हात लावला आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये रात्रीच्या वेळी एक महिला एका निर्जन भागातून कुठेतरी जात असल्याचे दिसत आहे. त्याच दरम्यान घोड्यावर स्वार असलेला एक माणूस तिथे पोहोचतो. त्याला पाहून ती महिला मागे वळते आणि पळून जाण्याचा प्रयत्न करते, परंतु चोर तिला पळून जाण्याची संधी देत ​​नाही. तो जबरदस्तीने महिलेकडून तिची बॅग हिसकावून घेतो आणि तेथून आरामात पळून जातो आणि ती महिला बघतच राहते.

या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ ट्विटर (Twitter) अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. सध्या या व्हिडिओची जोरदार चर्चा रंगली असून नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. "मुलींना वाटते की एक दिवस त्यांच्या स्वप्नांचा राजकुमार घोड्यावर बसून येईल, तर प्रत्यक्षात काहीतरी असेच घडलयं," असा भन्नाट कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मतदानाची का होतेय चर्चा?

Dindori Loksabha Election: दिवस मावळला तरी मतदार येईना; एकही मत न देणारं मेव्हणं गाव आलं चर्चेत

Rahu Gochar Effect: या राशींवर 2025 पर्यंत राहणार राहूची कृपा; प्रकृती चांगली राहील, खूप प्रगती होणार

HIV Vaccine : वैद्यकीय क्षेत्रातून आनंदाची बातमी! HIV वरील व्हॅक्सिनची यशस्वी चाचणी

किंमत फक्त 65,514 रुपये! वजन 93 किलो, मायलेज 50; जबरदस्त आहे TVS ची ही स्कूटर

SCROLL FOR NEXT