Kharghar Heatstroke News : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, सुषमा अंधारेंची मागणी

संदीप देशपांडेंना साधं खरचटलं सुद्धा नव्हतं, पण त्यांना बघायला भाजप नेत्यांनी मोठी गर्दी केली होती. मात्र खारघर मयत प्रकरणात भाजप काहीच बोलत नाहीत.
Sushma Andhare
Sushma Andhare Saam Tv
Published On

रणजीत माजगावकर

Kolhapur News : खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान उष्माघातामुळे 14 श्री सदस्यांना आपला प्राण गमवाला लागला आहे. मात्र या सोहळ्यादरम्यान नेमकं काय झालं, ही माहिती सार्वजनिक करावी अशी मागणी आता विरोधक करत आहेत. या मुद्द्यावर महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचवरही सदोषवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.

मागील दिवसांपासून खारघरचा मुद्दा पुढे येत आहे. मात्र सरकार त्याची जबाबदारी घेत नाही. कालचे व्हिडीओ विचलित करणारे आहेत. या कार्यक्रमासाठी एका कंपनीला 14 कोटींचं कंत्राट दिलं होतं. फुटकळ काम करणाऱ्यांना हे कंत्राट दिलं गेलं. या कंपनीत शिवसेनेचे (शिंदे गटाचे) प्रवक्ते नरेश मस्के यांची भागिदारी आहेत, असा गंभीर आरोपही सुषमा अंधारे यांनी केला आहे. (Latest News Update)

Sushma Andhare
Maharashtra Bhushan Award Sunstroke Tragedy: श्री सदस्यांच्या मृतांचा आकडा 14वर, विरार येथील महिलेचा उपचारदरम्यान मृत्यू

या कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे. तसेच संबंधित कंपनी ब्लॅकलिस्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Sushma Andhare
Ajit Pawar News: राष्ट्रवादीच्या कार्यक्रम पत्रिकेतून अजित पवारांचं नाव गायब, कारण अस्पष्ट

संदीप देशपांडेंना साधं खरचटलं सुद्धा नव्हतं, पण त्यांना बघायला भाजप नेत्यांनी मोठी गर्दी केली होती. मात्र खारघर मयत प्रकरणात भाजप काहीच बोलत नाहीत. हाच मुद्दा टाळण्यासाठी अजित पवार यांचा मुद्दा काढला. मात्र एकंदर परिस्थिती पाहता मुख्यमंत्री बदलण्याची गरज आहे. सरकारमध्ये ताळमेळ नाही. 25 लाख लोकांचा कार्यक्रम, अनेकांचा मृत्य झाला आणि एक सदस्यीय समिती कुठल्या तोंडाने नेमताय? असा सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com